मैदानावर गोलंदाजांची धू धू धुलाई करणाऱ्या स्मृती मानधनाला महागड्या गाड्यांचीही आवड आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक ढासू गाड्या आहेत.
स्मृती मानधनाची पहिली कार मारुती डिझायर आहे, जी तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खरेदी केली होती. मारुती डिझायर ही सेडान कार आहे आणि तिची एक्स-शोरूम किंमत ६.४४ लाख ते ९.३१ लाख रुपये आहे.
Hyundai Creta ही स्मृती मानधनाच्या कार कलेक्शनमधील दुसरी कार आहे. ही कॉम्पॅक्ट SUV आहे. Hyundai Creta ही या कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी SUV आहे, ज्याची किमती १०.६४ लाख ते १८.६८ लाख आहे.
स्मृती मानधनाकडे ऑडी कार आहे, परंतु ती कोणत्या सेगमेंटमधली आहे हे स्पष्ट नाही. भारतात ऑडी कारची किंमत ४३.८५ लाखांपासून ते २.५५ कोटीपर्यंत आहे.
BMW हे स्मृती मानधनाच्या कार कलेक्शनमधील चौथी गाडी आहे. भारतातील BMW कारची किंमत ४३.५० लाखांपासून ते २.६० कोटींपर्यंत आहे.
रेंज रोव्हर इव्होक एसयूव्ही ही स्मृती मंधानाच्या कार कलेक्शनमधील शेवटची आणि सर्वात महागडी कार आहे जी तिने २०२२ मध्ये दिवाळीला खरेदी केली होती. या लक्झरी एसयूव्हीची सुरुवातीची किंमत ७२.०९ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.