वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारताची उप कर्णधार आणि सलामीची बॅटर स्मृती मानधना धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात स्मृती मानधनाने सलग दुसरे शतक साजरे केले. तेही विक्रमी
स्मृती मानधनाने आधी २३ चेंडूत अर्धशक साजरे केले. त्यानंतर शतक ५० व्या चेंडूवर षटकार मारत तिने वनडे कारकिर्दीतील १३ व्या शतकाला गवसणी घातली.
या शतकी खेळीसह स्मृती मानधना हिने किंग विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला. भारताकडून वनडे सर्वात जलद शतक झळकवणाऱ्या पुरुष अन् महिला बॅटरच्या यादीत स्मृती अव्वलस्थानावर पोहचलीये.
स्मृती मानधना हिने विराट कोहलीलाच नव्हे तर सेहवाग अन् मोहम्मद अझरुद्दीन आणि केएल राहुल या दिग्गजांना तिने मागे टाकलंय.
विराट कोहलीनं २०१३ मध्ये जयपूरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात ५२ चेंडूत शतक झळकावले होते.
भारताचा माजी स्फोटक बॅटर वीरेंद्र सेहवागनं २००९ मध्ये हेमिल्टनच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत ६० चेंडूत शतक झळकावले होते.
२०१३ मध्ये विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरच्या मैदानातील वनडे सामन्यात ६१ चेंडूत शतक साजरे केले होते.
१९८८ मध्ये मोहम्मद अझरुद्दीन याने बडोदा येथील मैदानात खेळवण्यात आलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात ६२ चेंडूत शतक झळकावले होते.
२०२३ मध्ये बंगळुरुच्या मैदानात नेदरलंडविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलनं ६२ चेंडूत शतक झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. या सर्वांनी स्मृतीनं मागे टाकले आहे.