खास गिफ्टसह लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात पोहचली गिल-गंभीर जोडी, इथं पाहा Pics

BCCI नं शेअर केले टीम इंडियातील खेळाडूंचे खास फोटो

मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीतील झुंजारु खेळीनंतर टीम इंडियातील खेळाडू पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी मँचेस्टरहून लंडन येथे पोहचले आहेत.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून वॉशिंग्टन सुंदरसह टीम इंडियातील खेळाडूंचे लंडन येथील खास फोटो शेअर केले आहेत.

मँचेस्टर कसोटीत जिगरबाजी शतकी खेळी करणाऱ्या रवींद्र जडेजाचा अंदाजही लक्षवेधी ठरतोय.

कॅप्टन शुबमन गिलसह साई सुदर्शनची झलकक या फोटोत पाहायला मिळते.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षिक गौतम गंभीर यांनी उप उच्चायुक्त सुजीत घोष यांना स्वाक्षरी केलेली बॅट भेट स्वरुपात दिली.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुबमन गिल याने उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना स्वाक्षरी केलेली खास बॅट गिफ्ट केल्याचे पाहायला मिळाले.

लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयात भारतीय संघातील खेळाडूंच्या स्वागतासाठी खास तयारी करण्यात आली होती. यावेळी व्यापीठावर रवी शास्त्रींचीही झलका पाहायला मिळाली.

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील भेटीतील BCCI नं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सर्व खेळाडू एकत्रित जमल्याचे दिसून येत आहे.