Join us

Shreyas iyer: धोनी, विराट, रोहित नाही तर हा आहे श्रेयस अय्यरचा फेवरेट कर्णधार, नाव वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 21:49 IST

Open in App
1 / 5

गेल्या काही काळातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने भारतीय संघातील आपले स्थान पक्के केले आहे.

2 / 5

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत श्रेयसने सलग तीन अर्धशकते फटकावली. तर श्रीलंकेविरुद्धच्या बंगळुरू कसोटीत त्याने दोन्ही डावांत अर्धशतके फटकावली होती.

3 / 5

आता श्रेयस अय्यर इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामात कोलकाता नाईटरायडर्सकडून खेळताना दिसणार आहे. तसेच तो या संघाचं नेतृत्वही करणार आहे.

4 / 5

श्रेयस अय्यर आतापर्यंतच्या कारकिर्दीत विराट कोहली, रोहित शर्मासह इतर काही क्रिकेटपटूंच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. मात्र त्याने आवडता कर्णधार म्हणून महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांचं नाव घेतलेलं नाही. तर श्रेयस अय्यरने के. एल. राहुलची आपला आवडता कर्णधार म्हणून निवड केली आहे.

5 / 5

श्रेयस अय्यरने एका कार्यक्रमात सांगितले की, लोकेश राहुलच्या कप्तानीमध्ये खेळणे खूप चांगला अनुभव होता. सर्वप्रथम तो खूप चांगला खेळाडू आहे. तसेच मैदान आणि टीम मिटिंग्समध्ये तो जो आत्मविश्वास दाखवतो आणि खेळाडूंना तो जो पाठिंबा देतो. ते खूप चांगले आहे. मला त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यात खूप मजा आली.

टॅग्स :श्रेयस अय्यरभारतीय क्रिकेट संघलोकेश राहुल
Open in App