Join us  

ICC Men's ODI Team of the Year 2022 : बाबर आजमच्या नेतृत्वाखालील संघात दोन भारतीय खेळाडूंचा समावेश; आयसीसीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 1:02 PM

Open in App
1 / 12

बाबर आजम ( कर्णधार, पाकिस्तान) : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने पुन्हा एकदा ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये आपला पराक्रम दाखवला आणि जुलै २०२१ पासून ICC पुरुषांच्या वन डे रँकिंगमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. बाबरने या वर्षी खेळलेल्या नऊ सामन्यांमध्ये ८ वेळा पन्नास पेक्षा जास्त धावांची नोंद केली, त्यापैकी तीन खेळीचे त्याने शतकात रूपांतर केले आहे. त्याने ८४.८७ च्या जबरदस्त सरासरीने ६७९ धावा केल्या. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान तीन वन डे मालिका जिंकल्या. वनडे संघाचा कर्णधार म्हणून बाबरसाठी हे वर्ष संस्मरणीय ठरले. वन डे फॉरमॅटमध्ये पाकिस्तानने नऊपैकी फक्त एक सामना (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) गमावला.

2 / 12

ट्रॅव्हिस हेड ( ऑस्ट्रेलिया) - माजी कर्णधार अॅरॉन फिंचने ५० षटकांच्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ट्र‌ॅव्हिस हेडकडे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. हेडसाठी हे एक वर्ष लक्षात ठेवण्यासारखे होते. त्याने नऊ सामन्यांत ६८.७५ च्या सरासरीने ५५० धावा केल्या. त्याने ११२.२४ च्या स्ट्राइक-रेटने धावा केल्या आणि त्यात दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

3 / 12

शे होप ( वेस्ट इंडिज) - शे होपने वन डे फॉरमॅटमध्ये वेस्ट इंडिजसाठी सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याने ३५.४५ च्या सरासरीने तीन शतकं आणि दोन अर्धशतकांसह ७०९ धावा केल्या.

4 / 12

श्रेयस अय्यर ( भारत ) - श्रेयस अय्यर हा २०२२ पासून वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या सर्वात सातत्यपूर्ण फलंदाजांपैकी एक म्हणून उदयास आला. अय्यरने कॅलेंडर वर्षात १७ सामन्यांत ५५.६०च्या सरासरीने ७२४ धावा केल्या. ज्यात एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे.

5 / 12

टॉम लॅथम ( यष्टिरक्षक, न्यूझीलंड ) - टॉम लॅथमने २०२२ मध्ये त्याच्या खेळात एक नवीन आयाम लिहीला आणि त्याने अनेकदा पाच नंबरच्या स्थानावरून फिनिशरची भूमिका बजावली. लॅथमने १५ सामन्यांत ५५.८० च्या सरासरीने आणि १०१.२७ च्या स्ट्राइक रेटने ५५८ धावा केल्या. त्याने वर्षभरात दोन अर्धशतके आणि दोन शतके झळकावली आहेत. लॅथम देखील यष्टीमागे भक्कम होता आणि त्याने १६ बळी टिपले.

6 / 12

सिकंदर रझा ( झिम्बाब्वे ) - 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर झिम्बाब्वेचे पुनरुत्थान झाले आणि त्याचे बरेच श्रेय हे सिकंदर रझाला जाते. रझाने ४९.६१ च्या सरासरीने ६४५ धावा केल्या. त्यात तीन शतकं व दोन अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीतही कमाल दाखवताना त्याने आठ विकेट्स घेतल्या.

7 / 12

मेहदी हसन मिराझ ( बांगलादेश ) - मेहदी हसन मिराझ हा २०२२ मध्ये वन डे क्रिकेटमधील सर्वात सातत्यपूर्ण अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून उदयास आला. नेहमीप्रमाणेच प्रभावी गोलंदाजी करून आणि फलंदाजी अधिक विकसित करून मिराझने अनेकदा बांगलादेशला काही कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. त्याने १५ सामन्यांमध्ये २८.२० च्या सरासरीने २४ बळी घेतले आणि ४-२९ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. फलंदाजीत त्याने एक शतक आणि एक अर्धशतकांसह ६६ च्या सरासरीने ३३० धावा केल्या.

8 / 12

अल्झारी जोसेफ ( वेस्ट इंडिज) - जोसेफने २०२२ साली वेस्ट इंडिजसाठी उच्च दर्जाचा खेळ केला. त्याने १७ सामने खेळले आणि २५.७०च्या सरासरीने २७ बळी घेतले.

9 / 12

मोहम्मद सिराज ( भारत ) - मोहम्मद सिराजचे व्हाईट-बॉल क्रिकेटमधील कौशल्य विशेषत: २०२२ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये त्याने स्वतःचे नाणे खणखणीत वाजवले. त्याने १५ सामन्यांत २४ विकेट्स घेतल्या.

10 / 12

ट्रेंट बोल्ट ( न्यूझीलंड ) - डावखुरा वेगवान गोलंदाज जवळपास एक दशकापासून सातत्य राखत आहे आणि 2022 हे वर्ष वेगळे नव्हते. बोल्टने २०२२ मध्ये फक्त सहा खेळ खेळले पण त्यात त्याने मोठा प्रभाव पाडला. त्याने १८ विकेट्स घेतल्या व ४-३८ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

11 / 12

अॅडम झाम्पा ( ऑस्ट्रेलिया ) -ऑस्ट्रेलियन व्हाईट-बॉल सेटअपमध्ये अॅडम झम्पाने वन डे क्रिकेटमध्ये आपल्या देशासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून वर्ष पूर्ण केले.

12 / 12

टॅग्स :बाबर आजमआयसीसीश्रेयस अय्यरमोहम्मद सिराज
Open in App