"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?

Yograj Singh on Gautam Gambhir team India, Ind vs Eng : विराट,रोहितच्या निवृत्तीपासून गंभीरवर टीका केली जातेय.

Yograj Singh on Gautam Gambhir team India, Ind vs Eng : - Marathi News | Yograj Singh on Gautam Gambhir team India, Ind vs Eng Test Series | Latest cricket Photos at Lokmat.com

भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन कसोटी जिंकली. शुभमन गिल, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत आणि आकाश दीप यांनी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

गौतम गंभीर यांना संघाच्या कसोटी कामगिरीवरून बरीच टीका सहन करावी लागली. त्यामुळे आता विजयासाठी त्यांचे कौतुक व्हायला हवे, असे मत योगराज सिंह यांनी व्यक्त केले.

विराट कोहली, रोहित शर्मा यांनी कसोटी निवृत्तीची घोषणा केली, तेव्हा अनेक चाहत्यांनी यासाठी गंभीरला जबाबदार धरले होते. या साऱ्यांनाच योगराज यांनी रोखठोक उत्तर दिले.

तसेच, कुलदीपला संघात न घेणं, बुमराहला दुसऱ्या कसोटीत विश्रांती देणे या मुद्द्यांवरूनही गौतम गंभीरवर टीका झाली. पण त्याचे निर्णय योग्यच होते हे विजयामुळे सिद्ध झाले.

युवराज सिंहचे वडील योगराज सिंह म्हणाले, "भारतीय क्रिकेटपटू सध्या सातत्याने प्रगती करत आहेत आणि त्यांच्या खेळात सुधारणा होत आहे. त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे."

"गौतम गंभीरवर कोणीही टीका करू नये. तो खूप चांगली कामगिरी करतोय. युवराज आणि द्रविड प्रमाणेच गंभीरलाही क्रिकेटने बरेच काही दिले आहे, त्यामुळे तो क्रिकेटची सेवा करतोय."

"इंग्लंडविरुद्धची मालिका भारताने गमावली तरीही कुणी त्यांच्यावर टीका करू नका. कारण संघ हरतो स्पष्टीकरणाने समाधान होत नसते आणि संघ जिंकतो तेव्हा स्पष्टीकरणाची गरज नसते"

"भारतीय संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मला आशा आहे की आपला भारताचा संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली नक्कीच विजय साकारेल," असेही ते म्हणाले.