Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित शर्मा, हार्दिक पंड्याबरोबर खेळाडूंनी कसा सेलिब्रेट केला 'व्हॅलेनटाइन डे', पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 19:46 IST

Open in App
1 / 5

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने काही दिवसांपूर्वीच साखरपुडा केला. हार्दिकने सर्बियाच्या नताशा स्टानकोव्हिकबरोबर जानेवारी महिन्यात साखरपुडा केला. सध्या हार्दिक विश्रांती घेत असून त्याने सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे.

2 / 5

भारताचा धडाकेबाज सलामीवीर आणि उप कर्णधार रोहित शर्मा सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. या कालावधीमध्ये रोहित कुटुंबियांना वेळ देत असून उपचारही घेत आहे. रोहितने यावेळी पत्नी रितिकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

3 / 5

भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि हार्दिक पंड्याचा भाऊ कृणाल पंड्याचे यापूर्वीच पंखुडीबरोबर लग्न झाले आहे. कृणालने तिच्याबरोबर फोटो आज शेअर केला आहे.

4 / 5

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने पत्वी कँडिसबरोबरचा एक फोटो आज शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वीच वॉर्नरला ऑस्ट्रेलियातील नामांकित अॅलन बोर्डर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

5 / 5

भारताची फुलराणी सायना नेहवालने पती पारुपल्ली कश्यपबरोबरचा फोटो आजच्या दिवशी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी लग्न केले होते.

टॅग्स :व्हॅलेंटाईन्स डेहार्दिक पांड्यारोहित शर्माक्रुणाल पांड्याडेव्हिड वॉर्नरसायना नेहवालपारुपल्ली कश्यप