Asia Cup 2025 : दुबईचं तिकीट मिळालं; पण या स्टार खेळाडूवर तिथं जाऊन बाकावर बसण्याचीच येणार वेळ!

गिलमुळं आता ही जोडी फुटणार असल्याचे चित्र अगदी स्पष्ट दिसत आहे.

आशिया कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली. संजू सॅमसनला अपेक्षेप्रमाणे संघात स्थान मिळाले, पण दुबईचं तिकीट मिळालं असलं तरी तो बाकावरच बसल्याचे पाहायला मिळू शकते.

संजू सॅमसन हा विकेट किपर अन् सलामीवीराचा अतिरिक्त पर्याय म्हणून संघासोबत दिसेल. गेल्या काही दिवसांपासून तो जी भूमिका बजावत होता ती यावेळी त्याला मिळणार नाही, असेच दिसते.

शुबमन गिल उप कर्णधार होऊन परतल्यामुळे संजूला सलामीला संधी मिळणं मुश्किल झाले आहे.

शुबमन गिल नसल्यामुळे संजूला प्रमोशन मिळालं होतं, ही गोष्ट अजित आगरकर यांनीही बोलून दाखवलीये, त्यामुळे आता तो संघात असला तरी तो सलामीवीराचा अतिरक्त पर्याय म्हणूनच राहिल, हे चित्र जवळपास स्पष्ट झालंय.

आशिया कप स्पर्धेत आयसीसी टी-२० क्रमवारीत नंबर वन असलेल्या अभिषेक शर्मासोबत शुबमन गिल डावाची सुरुवात करताना दिसू शकतो.

संजू सॅमसन हा फक्त ओपनर बॅकअपच नव्हे तर विकेट किपिंगच्या बाबतीतही एक पर्यायीही खेळाडूच्या रुपातच संघासोबत दिसू शकतो.

आशिया कप स्पर्धेसाठी जितेश शर्माचीही टीम इंडियात वर्णी लागलीये. संजू टॉप ३ मध्ये बॅटिंग करणार नसेल तर तोच प्लेइंग इलेव्हनची पहिली पसंती ठरेल. कारण लोअर मिडल ऑर्डरमध्ये तो स्फोटक फलंदाजी करण्यासाठी माहिर आहे.

त्यामुळेच टीम इंडियासोबत दुबईला टेक ऑफ करण्याचं तिकीट मिळालं असलं तरी संजू सॅमसनसाठी जी परिस्थितीत निर्माण झालीये ती बाकावर बसण्याचे संकेत देणारी आहे.

गेल्या काही टी-२० मालिकेत संजू सॅमसन हा अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करताना दिसला होता. पण गिलमुळं आता ही जोडी फुटणार असल्याचे दिसते.