सौरव गांगुलीच्या मुलीला २२ व्या वर्षी ३० लाखांचे पॅकेज; जाणून घ्या सना गांगुलीची यशोगाथा

Sourav Ganguly Daughter: सना गांगुली अवघ्या २२ व्या वर्षी लाखोंचे पॅकेज घेते.

सना गांगुली ही भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची मुलगी आहे. मागील वर्षी तिने पदवी घेतली. खरं तर सना अवघ्या २२ व्या वर्षी लाखोंचे पॅकेज घेते.

सना लाखोंच्या पॅकेजवर MNC कंपनीत काम करत आहे. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

दरम्यान, पदवी घ्यायच्या आधीपासूनच सना या कंपनीत कार्यरत आहे. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन ही जगातील सर्वोत्तम संस्थांपैकी एक आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये हे विद्यापीठ सातव्या क्रमांकावर आहे.

सना २०२० पासून या जवळपास २०० वर्षे जुन्या विद्यापीठात शिकत आहे. तिचे पदवीचे शिक्षण मागील वर्षी पूर्ण झाले.

सनाने १२वी पर्यंतचे शिक्षण भारतातच घेतले. कोलकाता येथील प्रतिष्ठित लॉरेटो हाऊस स्कूलमधून २०२० मध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सना पदवीचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेली.

गांगुलीच्या लेकीला ICSE बोर्डातून बारावीत ९८ टक्के गुण मिळाले होते. यानंतर तिची युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनसाठी निवड झाली.

सनाने तिच्या लिंक्डइन प्रोफाईलमध्ये तिची माहिती सांगितली आहे. त्यानुसार तिने अर्थशास्त्रातून पदवीचे शिक्षण घेतले. हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम असतो. या काळात तिने अनेक ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवासाठी काम केले.

सना तिच्या अभ्यासासोबत यूसीएलमध्ये इंटर्नशिप देखील करत होती. तिने मे २०२० ते मार्च २०२२ कालावधीत इथे इंटर्नशिप केली.

त्यानंतर तिने ICIC प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ऑफ इंडियामध्ये एक वर्ष ११ महिने अर्थात जवळपास दोन वर्ष इंटर्नशिप केली.

विशेष बाब म्हणजे सनाने तिच्या अभ्यासादरम्यान Enactus UCL मध्ये पूर्णवेळ काम केले. या काळात तिला जगातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये HSBC, KPMG, Goldman Sachs, Barclays आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे.

PwC ही जगातील सर्वात मोठी आर्थिक सल्ला देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचा व्यवसाय जगातील १५२ देशांमध्ये आहे. या कंपनीत ३.२८ लाखांहून अधिक लोक काम करतात. या देखील कंपनीत सनाने काम केले आहे.

अशा आणखी काही कंपन्यांमध्ये सनाने काम केले आहे. या अशा कंपन्यांसोबत इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना भरघोस पैसेही दिले जातात. UK.indeed.com वेबसाइटनुसार, PwC मध्ये इंटर्नशिप करणाऱ्यांना प्रति वर्ष ३० लाख रूपये दिले जातात.