Arjun Tendulkar चे शुभमंगल! PM मोदी ते राष्ट्रपती मुर्मू... 'या' ४ बड्या नेत्यांना निमंत्रण

Sachin Tendulkar son Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding: अर्जुन तेंडुलकरचा विवाह सानियाशी ५ मार्चला होणार आहे

'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा विवाह मार्च महिन्यात प्रसिद्ध उद्योगपती घई यांची नात सानिया चांडोक हिच्याशी होणार आहे.

सचिनने या विवाहसोहळ्याचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत ४ बड्या नेत्यांना दिले आणि त्याबाबत सोशल मीडियावरही पोस्ट केली.

सचिनने मोदींसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिले, "अर्जुन आणि सानियाच्या विवाहासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित करण्याचे सौभाग्य लाभले. तुमचा आशीर्वाद आणि मोलाचा सल्ला मिळाला, त्याबद्दल आभार."

सचिनने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही लग्नाचे निमंत्रण दिले. त्याबद्दल त्याने लिहिले, "अमित शाह यांना लग्नासाठी निमंत्रित केले. त्यांनी आमचा यथोचित पाहुणचार केला. त्यांचे मनापासून आभार."

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही सचिनने लग्नाचे निमंत्रण दिले. सचिन, पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगी सारा, मुलगा अर्जुन, होणारी सूनबाई सानिया चांडोक सर्वच जण राष्ट्रपतींना भेटले आणि निमंत्रित केले.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही सचिनने आपल्या लेकाच्या लग्नसोहळ्याचे निमंत्रण दिले. अर्जुन-सानिया यांचे विवाहसोहळा ५ मार्च २०२६ रोजी मुंबई होणार असल्याचे बोलले जात आहे.