Join us

ऋतुराज-उत्कर्षाचा शाही विवाह ज्या हॉटेलमध्ये झाला, त्याचं एका दिवसाचं भाडं माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 20:33 IST

Open in App
1 / 9

Ruturaj Gaikwad Utkarsha Pawar Marriage: टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने शनिवारी उत्कर्षा पवारसोबत लग्नगाठ बांधली.

2 / 9

ऋतुराज आणि उत्कर्षा दोघे दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते. ऋतुराजचे नाव WTC Final 2023साठी स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत होते. पण लग्नासाठी त्याने आपले नाव मागे घेतले.

3 / 9

शनिवारी रात्री उशीरा ऋतुराजने लग्नाचे फोटो पोस्ट केले. महाबळेश्वरच्या एका आलिशान रिसॉर्टमध्ये त्यांचे लग्न पार पडले.

4 / 9

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल विजेतेपद जिंकल्यानंतर ऋतुराज आणि उत्कर्षा पहिल्यांदाच एकत्र दिसले. कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि ट्रॉफीसोबत दोघांचा फोटो सोशल मीडियावर समोर आला होता.

5 / 9

ऋतुराजने त्या दोघांचाही IPLमधील फोटो पोस्ट केला होता. त्याशिवाय मेहंदी सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यावर चाहत्यांनी प्रचंड उत्साहात कमेंट केल्या होत्या.

6 / 9

ऋतुराज गायकवाड महाराष्ट्राची क्रिकेटपटू उत्कर्षा पवारला बऱ्याच दिवसांपासून डेट करत होता. उत्कर्षा त्याला पाठिंबा देण्यासाठी अनेकदा स्टेडियममध्ये यायची.

7 / 9

ऋतुराज आणि उत्कर्षा दोघांनीही डिझायनर कपडे घातले होते. दोघांनीही महाराष्ट्रीयन लूक कॅरी केला होता. त्यातही ऋतुराजने उत्कर्षाच्या साडीसोबत जुळणारी पगडी घातली होती.

8 / 9

ऋतुराज आणि उत्कर्षा यांचा विवाह महाबळेश्वरमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये पार पडला. तुम्हीही या हॉटेलमध्ये तुमचे लग्न किंवा कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी या हॉटेलचे भाडे आम्ही तुम्हाला सांगतो.

9 / 9

ऋतुराज आणि उत्कर्षा यांचे लग्न झालेल्या महाबळेश्वरमधील आलिशान अशा ले मेरिडियन हॉटेलमध्ये झाले. या हॉटेलमधील एका दिवसाचे भाडे हे १७,१४९ ते ३३,४९९ रुपये आहे.

टॅग्स :ऋतुराज गायकवाडलग्नमहाबळेश्वर गिरीस्थानहॉटेलमहेंद्रसिंग धोनी
Open in App