किरॉन पोलार्ड आणि मिचेल स्टार्क यांच्यातील वाद: २०१४ च्या आयपीएलमध्ये कायरन पोलार्ड आणि मिशेल स्टार्क यांच्यात जोरदार वाद झाला. आरसीबी आणि एमआय यांच्यातील सामन्यात स्टार्कने पोलार्डला बाउन्सर टाकला. त्यानंतर तो त्याच्याकडे गेला आणि काहीतरी म्हणाला. त्यानंतर पोलार्डने क्रीज सोडली आणि पुढचा चेंडू खेळला नाही. त्यावेळी पोलार्ड क्रिजमध्ये उभा असताना स्टार्कने त्याच्या दिशेने चेंडू फेकून मारला. यानंतर संतापलेल्या पोलार्डने स्टार्कच्या दिशेने बॅट फेकली. सुदैवाने,बॅट स्टार्कला लागली नाही.
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात राडा: २०१३ च्या आयपीएलमध्ये विराट कोहली आणि नवीन हुल यांच्यात मैदानात वाद झाला. तेव्हा कोहली आरसीबीचा कर्णधार होता आणि गंभीर केकेआरचा कर्णधार होता. एका सामन्यादरम्यान कोहली बाद झाल्यानंतर पव्हेलियनमध्ये जात असताना गंभीरने काहीतरी म्हणाला होता, ज्यामुळे विराट कोहली भडकला. विराट कोहली आणि गंभीर यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून आले. परंतु, पंचांनी वेळेत मध्यस्ती केली आणि दोघांमधील वाद मिटवला.
हरभजन सिंगने श्रीशांतच्या कानशिलात मारली: आयपीएलच्या पहिल्या हंगामात हरभजन सिंहने मुंबई इंडियन्सकडून खेळताना पंजाब किंग्जचा खेळाडू एस श्रीशांतच्या कानशिलात मारली होती. त्यानंतर श्रीशांत मैदानातच रडला. त्यानंतर हरभजनवर ११ सामन्यांची बंदी घालण्यात आली.
विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील भांडण: २०२३ च्या आयपीएलदरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील वाद बराच काळ चर्चेत राहिला. आरसीबी आणि लखनौच्या सामन्यात नवीन उल हकचे विराटशी भांडण झाले. कोहलीने त्याच्या बुटातील धूळ काढून नवीनला इशारा केला. त्यानंतर हे प्रकरण आणखी वाढले.
दिग्वेश सिंह राठी आणि अभिषेक शर्मा यांच्यात वाद: लखनौ सुपर जायंट्सचा फिरकी गोलंदाज दिग्वेश सिंग राठी याला नोटबंदी सेलिब्रेशन केल्याबद्दल आधीच दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे, परंतु त्याने असे करणे थांबवले नाही. या सेलिब्रेशनमुळे त्याचे अभिषेक शर्माशी भांडण झाले. नंतर पंच आणि इतर खेळाडूंना प्रकरण सोडवण्यासाठी मध्यस्थी करावी लागली.