टीम इंडियाने कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेला जोरदार दणका दिला. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने २-१ असा धडाकेबाज विजय मिळवला.
या मालिकेत तीनही सामन्यांमध्ये भरपूर धावा झाल्या. मालिकेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, भारताचा रनमशिन विराट कोहली याने दोन शतके आणि एक नाबाद अर्धशतक झळकावले.
दुसरीकडे रोहित शर्माने दोन डावात अर्धशतके झळकावली. त्यामुळेच ताज्या ICC ODI क्रमवारीत रोहित अव्वलस्थानी कायम आहे तर विराट कोहली दोन स्थानांच्या बढतीसह दुसऱ्या स्थानी विराजमान झाला.
रोहित शर्माने पहिल्या सामन्यात ५७ धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात तो स्वस्तात बाद झाला. पण तिसऱ्या सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने ७५ धावांची दमदार खेळी केली.
विराट कोहलीने १३५ धावांची झंजावाती शतकी खेळी केली. दुसऱ्या सामन्यातही विराटने दमदार १०२ धावांची खेळी केली, तर तिसऱ्या सामन्यात धावांचा पाठलाग करत असताना तो ६५ धावांवर नाबाद राहिला.
रोहित आणि विराट चांगल्या फॉर्मात आहेत. तशातच माजी वर्ल्डकप विजेता कर्णधार कपिल देव यांनी या दोन स्टार खेळाडूंना एक अजब सल्ला दिला आहे.
प्रत्येकाला पैसा हवा असतो. त्यामुळे प्रत्येक खेळाडू विविध क्रिकेट लीगमध्ये खेळत असतो. पण मला अजूनही असे वाटते की IPL पेक्षाही टीम इंडियासाठी खेळणे हे जास्त अभिमानाचे असायला हवे.'
'प्रत्येकाची खेळण्याची पद्धत वेगळी असते. पण तरीही मला असे वाटते की, मोठे फटके खेळण्याची सवय करण्यासाठी रोहित आणि विराटने गोल्फ खेळावे,' असा अजब सल्ला कपिल देव यांनी दिला.