Join us

"रोहित Mumbai Indians चा कॅप्टन नाहीये, हा हार्दिक पांड्याचा संघ आहे, त्यामुळे... - अंबाती रायुडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 10:03 IST

Open in App
1 / 8

मुंबई इंडियन्स हा संघ IPLमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानला जातो. पण यंदाच्या हंगामात या संघाला अजून फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.

2 / 8

हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव अशा स्टार फलंदाजांचा भरणा आहे. तसेच ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, दीपक चहर असे भेदक मारा करणारे गोलंदाजही आहेत.

3 / 8

स्टार खेळाडूंचा समावेश असूनही मुंबईचा पहिल्या ५ पैकी ४ सामन्यात पराभव झाला. मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन मैदानावर जे निर्णय घेत असते त्यावर बरीच चर्चा रंगल्याचे दिसते.

4 / 8

रोहित शर्मा हा उत्तम लीडर, तरीही त्याला फिल्डिंगच्या वेळी संघाबाहेर बसवतात. त्याचा अनुभव हार्दिकच्या कामी येऊ शकेल असे मत माजी क्रिकेटर संजय बांगर यांनी मांडले होते.

5 / 8

या चर्चेत अंबाती रायुडूही बसला होता. त्याने बांगर यांच्या मताशी असहमती दाखवली. तो म्हणाला, 'हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी करताना कुणाची गरज आहे असं मला वाटत नाही.'

6 / 8

'कर्णधाराला मैदानात एकटं सोडायला हवं. हार्दिकला त्याचे निर्णय त्याला घेऊ दे. गेल्या वर्षीप्रमाणे मुंबईच्या एकाच संघात १० जण कॅप्टनसारखे वागले तर मग पुन्हा गोंधळ होईल.'

7 / 8

'रोहित हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. भारताचा सामना असतो तेव्हा तो निर्णय घेत असतो. त्यामुळे IPLच्या स्पर्धे दरम्यानही तसेच घडणार, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवे.'

8 / 8

'रोहित हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन नाहीये. हा संघ हार्दिक पांड्याचा आहे. त्यामुळे हार्दिकला हवे तसे निर्णय घेऊदेत. हार्दिकला जे योग्य वाटतं तेच घडायला हवं,' असं रायुडू म्हणाला.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सरोहित शर्माहार्दिक पांड्याअंबाती रायुडू