रोहित शर्मा हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आधी त्याने वजन घटवले आणि फिटनेसचा नमुना सादर केला. त्यानंतर कर्णधारपद काढून घेण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
सध्या मात्र रोहित शर्मा एका वेगळ्या कारणाने चर्चेचा विषय ठरला आहे. ते कारण म्हणजे त्याने घेतलेली नवी आलिशान कार. रोहितने नवी Tesla Model Y कार नुकतीच विकत घेतली आहे.
रोहितच्या नवीन कारची काही खास वैशिष्ट्ये आहेत. तसेच, कारची किंमतही खूप जास्त आहे. परंतु कारचा परफॉमन्सही तितकाच जोरदार आहे. त्यामुळेच या कारची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
सोशल मीडियावर काही फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये रोहित शर्मा नवीन टेस्ला मॉडेल वाय चालवताना दिसतोय. एका वृत्तानुसार, रोहितने नुकतीच ही कार खरेदी केली आहे.
रोहित शर्माच्या नवीन कारला खास नंबर प्लेट आहे. त्याच्या आधीच्या कारप्रमाणेच त्याच्या नव्या कारचा नंबरही, ३०१५ म्हणजेच मुलांच्या जन्मतारखेवरून आधारित आहे.
रोहितचा व्हिडीओ Rushiii_12 नावाच्या युजरने सोशल मीडियावर पोस्ट केलाय. रिपोर्ट्सनुसार, ही टेस्ला मॉडेल वाय रियर-व्हील ड्राइव्ह स्टँडर्ड रेंज व्हेरिएंट असून आलिशान इलेक्ट्रिक कार आहे.
टेस्ला मॉडेल Y मध्ये १५.४-इंच टचस्क्रीन, गरम आणि हवेशीर सीट्स, अॅम्बियंट लाइट्स, रियर-व्हील ड्राइव्ह, नऊ स्पीकर्स, AEB, ब्लाइंड-स्पॉट टक्कर वॉर्निंग आणि टिंटेड ग्लास रूफ यासह अनेक उत्तम वैशिष्ट्ये आहेत.
टेस्ला मॉडेल वाय मध्ये बनावटीमध्ये कमी आणि लांब पल्ल्याचे बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत. ही कार एका चार्जवर ५०० आणि ६२२ किलोमीटर चालवता येते.
टेस्लाने जुलैमध्ये भारतीय बाजारात मॉडेल वाय लाँच केले. या कारची किंमत ₹५९.८९ लाख (एक्स-शोरूम, भारत) आहे. यातील टॉप-ऑफ-द-लाइन लाँग रेंज व्हेरिएंटची किंमत ₹६७.८९ लाख (एक्स-शोरूम, भारत) आहे.