Join us  

दोघांना विश्रांती, दोघांना सुट्टी; ७ खेळाडू मुकणार! भारतीय संघात महत्त्वाचे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 9:57 AM

Open in App
1 / 8

भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह तिसऱ्या वन डेत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षर पटेलची फिटनेस अजूनही चिंतेचं कारण बनली आहे आणि त्यामुळे तो वर्ल्ड कप स्पर्धेतही खेळेल की नाही, याबाबत शासंकता आहे. आर अश्विनने दुसऱ्या वन डे सामन्यात चांगली कामगिरी केली आहे, परंतु उद्यापर्यंत वर्ल्ड कप संघात बदल करता येणार आहे.

2 / 8

ऋतुराज गायकवाडनेही सलामीला खेळताना ७१ व ८ धावा केल्या आणि त्याला आता रिलीज केले गेले आहे. आशियाई स्पर्धा २०२३साठीच्या संघाचा तो कर्णधार आहे आणि तो आता चीनसाठी रवाना होणार आहे.

3 / 8

जलदगती गोलंदाज शार्दूल ठाकूर यालाही वर्कलोड मॅनेज करण्यासाठी विश्रांती दिली गेली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांत शार्दूल पूर्णपणे अपयशी ठरला. त्याला विकेट घेता आली नाही, सोबत त्याने भरपूर धावाही दिल्या.

4 / 8

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील सुपरस्टार शुबमन गिल याला तिसऱ्या वन डेत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आगामी वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून हा संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. २४ वर्षीय सलामीवीराने पहिल्या दोन सामन्यांत ७४ व १०४ धावांची खेळी केली होती.

5 / 8

प्रसिद्ध कृष्णाने दुसऱ्या वन डे सामन्यात दोन विकेट्स घेतल्या. त्याचीही पहिल्या दोन सामन्यांसाठीच संघात निवड केली गेली होती आणि त्यामुळे तोही तिसऱ्या वन डेत दिसणार नाही.

6 / 8

अक्षर पटेलची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे साठी भारतीय संघात निवड केली गेली होती, परंतु क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. आशिया चषकाच्या सामन्यात त्याच्या मनगटावर चेंडू आदळला होता आणि त्याने फायनलपूर्वी माघार घेतली होती.

7 / 8

तिलक वर्माहीची निवड पहिल्या दोन सामन्यांसाठीच केली गेली होती. तो आशियाई स्पर्धा २०२३च्या संघाचा सदस्य आहे आणि आता तोही चीनसाठी रवाना होणार आहे.

8 / 8

मुकेश कुमारला जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून दुसऱ्या वन डे सामन्यासाठी बोलावले होते, परंतु संधी न देताच त्यालाही माघारी जावे लागेल. जसप्रीत बुमराह तिसऱ्या वन डेत खेळणे निश्चित आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशुभमन गिलऋतुराज गायकवाडअक्षर पटेल