भारताचा धडाकेबाज फलंदाज यशस्वी जयस्वाल हा हल्ली त्याच्या खेळासोबतच पर्सनल लाईफबाबतही बराच चर्चेत राहू लागला आहे. यशस्वीची एक मैत्रिण असून मागच्या अनेक वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता स्वत: यशस्वीनेच ही कथित गर्लफ्रेंडबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
यशस्वी जयस्वाल हा इंग्लंडमधील त्याची मैत्रिण मॅडी हॅमिल्टन हिला डेट करत असून, हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या वावड्या सोशल मीडियावर उठल्या होत्या. तसेच दोघांचेही काही एकत्रिक फोटो व्हायरल झाल्याने या चर्चांना बळ मिळालं होतं.
२०२४ साली भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये हैदराबाद येथे झालेल्या कसोटी सामन्यामध्ये मॅडी ही यशस्वी जयस्वाल याला सपोर्ट करताना दिसली होती. तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती.
मात्र आता या दोघांचंह ब्रेक अप झालं असून, त्यांनी सोशल मीडियावरून एकमेकांना फॉलो करणं बंद केल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर स्वत: यशस्वीने त्याच्या लव्हलाईफबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. सध्यातरी मी सिंगल असून, मी कुणालाही डेट करत नाही आहे, असे त्याने सांगितले.
मॅडी हॅमिल्टनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा यशस्वीने फेटाळून लावला आहे. तसेच मॅडी आणि मी केवळ चांगले मित्र आहोत. तसेच आमच्यामध्ये कुठलेही रोमँटिक संबंध नाही आहेत, असे त्याने सांगितले. एवढंच नाही तर मॅडी आणि तिचा भाऊ हेन्री हॅमिल्टनसोबतही माझी चांगली मैत्री आहे, असेही यशस्वीने सांगितले.