आयपीएलच्या यंदाच्या हंगामात नव्या चेहऱ्यांसह ४ वर्षांपासून टीम इंडियाबाहेर असलेला भारतीय जलदगती गोलंदाज आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवून मैदान गाजवताना दिसत आहे.
टीम इंडियाकडून २०२२ मध्ये अखेरचा आंतरारष्ट्रीय टी-२० सामना खेळलेल्या भुवनेश्वर कुमारचं करिअर संपल्यात जमा असल्याची चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगली. पण तोच यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स मिळवत पर्पल कॅपसह मिरवताना दिसतोय.
RCB च्या संघाकडून खेळणाऱ्या भुवीनं ११ सामन्यात २१ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात पर्पल कॅपचा तो प्रबळ दावेदार आहे. एवढेच नाही तर यंदाचा हंगाम गाजवत त्याला मोठा विक्रम नावे करण्याची संधी आहे.
IPL च्या आतापर्यंतच्या १८ वर्षांच्या इतिहासात भुवनेश्वर कुमार, ड्वेन ब्रावो आणि हर्षल पटेल यांनी दोन वेळा पर्पल कॅप जिंकली आहे. यंदाचा हंगाम भुवीला तिसऱ्यांदा पर्पल कॅप पटकवण्याचा विक्रम खुणावत आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चेन्नई सुपर किंग्सचा अंशुल कंबोज ११ सामन्यातील १९ विकेट्स घेत दुसऱ्या स्थानी आहे.
गुजरात टायटन्सच्या संघाकडून कगिसो रबाडाने ११ सामन्यात १८ विकेट्स घेतल्या असून तोही पर्पल कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे.
लखनौ सुपर जाएंट्सच्या संघातील अनकॅप्ड भारतीय प्रिन्स यादव याने ११ सामन्यात १६ विकेट्स घेत सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. उर्वरित सामन्यात तो यात किती विकेट्सची भर घालणार ते पाहण्याजोगे असेल.
सनरायझर्स हैदराबादच्या संघातील एशान मलिंगाने ११ सामन्यात एकदा चार विकेट्सचा डाव साधत १६ विकेट्स घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप ५ मध्ये आहे.