Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 19:19 IST

Open in App
1 / 8

भारतीय संघाचे दोन बडे खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा सध्या मैदान गाजवताना दिसत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्यांनी आपली चमक दाखवली आहे.

2 / 8

ऑस्ट्रेलियाविरूद्ध रोहितने एक अर्धशतक आणि एक शतक ठोकले. नंतर आफ्रिकेविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यातही रोहित शर्माने तोच फॉर्म कायम ठेवत अर्धशतक केले.

3 / 8

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियात अर्धशतक केले होते. त्यानंतर आफ्रिकेविरूद्ध त्याने सलग दोन सामन्यात दोन शतके ठोकली आणि टीकाकारांसह साऱ्यांनाच गप्प करून टाकले.

4 / 8

दोन्ही खेळाडू सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. २०२७चा विश्वचषक खेळण्यासाठी फिटनेसवरही मेहनत घेत आहेत. अशातच माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक सल्ला दिला आहे.

5 / 8

रोहित आणि विराट दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली. त्यांना तसे करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप होत आहे. तशातच रवी शास्त्रींचे विधान महत्त्वाचे ठरत आहे.

6 / 8

'विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही 'दादा' खेळाडू आहेत. ते दोघेही खूप बडे खेळाडू आहेत. विराट-रोहितसारख्या बड्या खेळाडूंच्या नादाला लागू नका.'

7 / 8

'काही लोक विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडूंशी उगाच वैर घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे मला दिसत आहे.'

8 / 8

'अशाप्रकारे बड्या खेळाडूंच्या वाट्याला जाऊ नका. जर दोघांनी एकत्र येऊन काही ठरवलं तर मग जे लोक नादाला लागलेत ते कुठे गायब होतील कळणारही नाही'

टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीरोहित शर्मारवी शास्त्रीगौतम गंभीर