Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉट मॉडेल, राजघराण्याशी संबंध, रवी शास्त्रींसोबत दिसलेली ही महिला आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 13:37 IST

Open in App
1 / 7

भारत आणि इंग्लंडच्या संघांमधील कसोटी मालिका सध्या इंग्लंडमध्ये रंगलेली असतानाच क्रीडा जगतातील प्रतिष्ठित अशी विम्बल्डन स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेतीत पुरुष एकेरीचं विजेतेपद यानिक सिनर याने पटकावले. विम्बल्डनमधील सामने पाहण्यासाठी सचिन तेंडुलकर, विराट कोहलीसह अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी आवर्जुन उपस्थिती लावली. दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू, माजी प्रशिक्षक आणि प्रख्यात समालोचक रवी शास्त्री यांची या स्पर्धेतील उपस्थिती लक्षवेधी ठरली. यादरम्यानचा एक फोटो आता चर्चेचा विषय ठरला आहे.

2 / 7

रवी शास्त्री यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ते एका परदेशी महिलेसोबत दिसत आहेत. हा फोटो या परदेशी महिलेने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये अपलोड केला होता. तसेच हा फोटो रवी शास्त्री यांनी आपल्या आयडीवरून रिशेअर केला आहे. त्यामुळे आता ही महिला कोण हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

3 / 7

रवी शास्त्रींसोबत दिसलेली ही महिला कुणी सर्वसामान्य नाही तर ब्रिटिश राजघराण्याशी संबंधित आहे. तिचं नाव इसाबेला हार्वे आहे. इसाबेला ही ब्रिस्टलचे सहावे मार्क्वेस यांची सर्वात लहान मुलगी आहे. तसेच लेडि व्हिक्टोरिया हार्वे यांची बहीण आहे.

4 / 7

४८ वर्षीय इसाबेला आता आलिशान आणि आरामदायी जीवन सोडून पोर्तुगालमधील अल्गार्वे येथे साधेपणाने राहत आहे. इलाबेलाची बहीण लेडी व्हिक्टोरिया हर्वे ही एकेकाळी हायप्रोफाईल पार्टी गर्ल म्हणून प्रसिद्ध होती. तसेच तिचे अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबतचे अफेअर्सही चर्चेत होते.

5 / 7

इसाबेला हिने बेल्जियममधील उद्योगपती क्रिस्टोफ डे पाव याच्याशी लग्न केलं होतं. मात्र २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांमधील नातेसंबंध कटू आठवणींसोबत संपुष्टात आले. त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी अशी मिळून तीन मुले आहेत. इसाबेला हिने तिच्या वैवाहिक जीवनाचा उल्लेख दु:खद आणि असह्य असा केला होता.

6 / 7

लग्नाआधी आणि आई होण्यापूर्वी इसाबेला ही ब्रिटनमधील प्रसिद्ध रियालिटी टीव्ही पर्सनॅलिटी होती. तिने अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. सेलिब्रिटी मास्टरशेफ, सेलिब्रिटी लव्ह आयलँड्ससारख्या कार्यक्रमांमध्ये ती दिसली होती. आता मात्र ती छोट्या छोट्या भूमिकांवर समाधानी आहे.

7 / 7

दरम्यान, रवी शास्त्री हे सध्या इंग्लंडमध्ये असून, ते भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेचं समालोचन करत आहेत.

टॅग्स :रवी शास्त्रीभारतीय क्रिकेट संघसेलिब्रिटीरिलेशनशिप