WPL ट्रॉफी जिंकताच नीता अंबानींनीही जॉईन केली खेळाडूंसोबतची 'सेलिब्रेशन पार्टी'; पाहा खास फोटो

दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांदा WPL स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.

मुंबई येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या WPL चा फायनल सामना खेळवण्यात आला. शेवटपर्यंत रगतदार झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन् महिला संघानं बाजी मारली अन् दुसऱ्यांदा ही स्पर्धा गाजवली.

हरमनप्रीत कौरनं २०२३ च्या पहिल्या हंगामानंतर तिसऱ्या हंगामा दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्सच्या संघाला जेतेपद मिळवून दिल्याचे पाहायला मिळाले.

प्रत्येक मॅचप्रमाणे फायनलमध्ये हरमनप्रीत ब्रिगेडला चीअर करण्यासाठी मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघाच्या मालकीण नीता अंबानीही स्टेडियमवर उपस्थितीत होत्या.

आपल्या संघांनं दुसऱ्यांदा फायनल बाजी मारल्यावर नीता अंबांनीच्या चेहऱ्यावर आनंदही बघण्याजोगा होता. मग त्याही मैदानात येऊन संघातील खेळाडूंसोबत विजयाचे सेलिब्रेशन करताना दिसल्या.

नीता अंबानी यांनी पोडियमवर संघातील खेळाडूसह ट्रॉफीसोबतही फोटो काढल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई इंडियन्सच्या संघाला दुसऱ्यांदा चॅम्पियन केल्यावर कॅप्टन हरमनप्रीतनं ट्रॉफीसह काढलेला हा खास फोटोही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

नॅटली सायव्हर ब्रंट हिने ऑरेंज कॅप, कॅप्टन हरमनप्रीत कौरची फायनलमधील फिफ्टी आणि अमेलिया कर हिने पर्पल कॅपसह संघाला जेतेपद मिळून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

हरमनप्रीत कौर ब्रिगेडचा फायनल सामना पाहण्यासाठी पुरुष फ्रँचायझी संघातील पोलार्ड, महेला जयवर्धने आणि तिलक वर्मा यांनीही हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.