मुंबई इंडियन्सच्या संघाला प्लेऑफ्सचे तिकीट मिळवण्यासाठी उर्वरित दोनही सामने जिंकावे लागणार आहेत. त्यांचा पुढला सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.
दिल्ली आणि मुंबई यांच्यात बुधवारी सामना खेळवला जाईल. त्यात जो संघ हरेल, त्याचा स्पर्धेतील प्रवास जवळपास संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
दिल्ली विरूद्धचा सामना मुंबईसाठी करो वा मरो असा असणार आहे. त्यामुळे या सामन्याआधी MI ने तब्बल तीन नवे खेळाडू संघात दाखल करून घेतले आहेत.
आफ्रिकेचा रायन रिकल्टन आणि ऑस्ट्रेलियाचा कॉर्बिन बॉश हे दोघे WTC FINAL मुळे तर विल जॅक्स द्विपक्षीय मालिकेमुळे IPL मधून बाहेर जाणार आहेत.
इंग्लंडचा अनुभवी यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow ) याला रायन रिकल्टनच्या जागी संघात घेतले आहे. त्याच्या नावावर तब्बल ५००० हून अधिक धावा आहेत.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसन ( Richard Gleeson ) याला कॉर्बिन बॉशच्या जागी करारबद्ध केले गेले आहे. रिचर्ड ग्लीसनच्या नावावर १००हून अधिक बळींची नोंद आहे.
याशिवाय, विल जॅक्सच्या जागी श्रीलंकन कर्णधार चरिथ असलंकाला ( Charith Asalanka ) करारबद्ध केले आहे. त्याने १०० हून अधिक टी२० मध्ये २७०० धावा केलेल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने अधिकृतरित्या या तिघांचे संघात स्वागत केले आहे. आता दिल्ली विरूद्धच्या सामन्यात मुंबईचा संघ कसा खेळतो याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.