भारतीय संघाचा फिरकीपटू राहुल चहर याचा शुक्रवारी प्रेयसी इशानीसह साखरपुडा झाला. त्याच्या या सोहळ्याला नजीकचे मित्र आणि कुटुंबीय हजर होते.
राहुल हा भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर याचा चुलत भाऊ आहे. अवघ्या 20व्या वर्षी राहुलनं साखरपुडा केला.
दीपक चहलनं भावाच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.
राहुलनं टीम इंडियाचे ट्वेंटी-20 सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहेत. मुंबई इंडियन्सकडून त्यानं 13 सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या आहेत.
राहुलनं 5 नोव्हेंबर 2016मध्ये राजस्थान संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढच्याच वर्षी त्यानं लिस्ट ए सामनाही खेळला
2017मध्ये त्याला इंडियन प्रीमिअर लीगमधील रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघानं 10 लाखांत आपल्या ताफ्यात घेतले.
त्यानंतर पुढील मोसमात मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेतले.मुंबई इंडियन्सकडून त्यानं 13 सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या आहेत.
विजय हजारे चषक स्पर्धेत 2018-19 च्या मोमसात राजस्थान संघाकडून सर्वाधिक 20 विकेट्स घेण्याचा पराक्रम त्यानं केला.