महिला प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील न्यूझीलंडची स्टार ऑलराउंडर अमेलिया केर ही मैदानातील कामगिरीशिवाय खास अदाकारीमुळे चर्चेत राहणारा चेहरा आहे.
WPL मधील यंदाच्या चौथ्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरलेली ही फॉरेनची ब्युटी एका खास कारणामुळे चर्चेत आहे. इथं जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास गोष्ट
न्यूझीलंडची स्टार खेळाडू अमेलिया केर हिने मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना भारतीय क्रिकेट प्रेमींमध्ये आपली खास छाप सोडली आहे.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या यूपी वॉरियर्सच्या विरुद्धच्या सामन्यात अमेलिया केर हिने WPL खास अर्धशतकासह इतिहास रचला आहे.
WPL च्या इतिहासात ५० विकेट्स घेणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. दीप्ती शर्माच्या रुपात तिने हा खास आणि ऐतिहासिक टप्पा गाठला.
महिला प्रीमियर लीग स्पर्धत आतापर्यंत तिने ३४ सामन्यात ५० विकेट्स घेतल्या आहेत. ३८ धावा खर्च करून पाच विकेट्स ही तिची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
WPL २०२५ च्या गत हंगामात सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅपसह तिने मुंबई इंडियन्सला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
यूपी वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात ३ विकेट्सचा डाव साधत यंदाच्या हंगामातही ती पर्पल कॅपच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे.
यंदाच्या हंगामात ५ सामन्यात तिने १० विकेट्स घेतल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत श्रेयंका पाटील आणि सोफी डिवाईन प्रत्येकी ८-८ विकेट्स घेत संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
यंदाच्या हंगामातही ती MI साठी गत हंगामातील पुनरावृत्ती करून दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.