धोनीचा बालपणीचा मित्र आणि व्यवस्थापक असलेल्या मिहिर दिवाकरने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे.
या फोटोमध्ये धोनी नेत्यांच्या लूकमध्ये दिसत आहे. हा फोटा पोस्ट केल्यावर तो वाऱ्यासारखा वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी, धोनी राजकारणात येणार असल्याचे सुतोवाच केले होते.
लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी धोनीची भेट घेतली होती. त्यावेळी धोनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.
धोनीने मात्र याबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.
एका जाहिरातीसाठी धोनीने हा लूक केल्याचे बोलले जात आहे.