MS Dhoni Luxury Bike Collection: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची बाईक्स आवड सर्वश्रुत आहे. त्याच्या रांचीमधील फार्महाउसमध्ये एक भलेमोठे गॅरेज आहे, ज्यात 100 हून अधिक बाईक्सचे मोठे कलेक्शन आहेत. यामध्ये तुम्हाला सुपरस्पोर्ट्स बाईक्सपासून ते विंटेज आणि क्रूझर बाईक्सपर्यंत सर्व काही मिळेल. चला तर मग जाणून घेऊ धोनीच्या काही निवडक बाईक्सबद्दल...
Confederate Hellcat X132-धोनीकडे Confederate Hellcat X132 बाईक आहे. ही बाईक अद्वितीय आणि दुर्मिळ आहे. तिचे उत्पादन खूप मर्यादित आहे. या बाईकची किंमत सुमारे 47 लाख रुपये आहे. या बाईकमध्ये 2.2 लीटर व्ही-ट्विन इंजिन आहे, जे 130 एचपी पॉवर आणि 200 एनएम टॉर्क जनरेट करते.
Kawasaki Ninja ZX-14R-धोनीच्या गॅरेजमध्ये Kawasaki Ninja ZX-14R सुपरबाईकदेखील आहे. त्याच्याकडे याचे ब्लॅक शेड एडीशन आहे. यामध्ये 1,441 cc, 4 सिलिंडर इंजिन आहे, जे 200 hp पॉवर जनरेट करते. याची टॉप स्पीड 300 km/h आहे.
Kawasaki Ninja H2-धोनीकडे Kawasaki Ninja H2 देखील आहे. तो या बाईकचा भारतातील पहिला मालक आहे. याची एक्स शोरुम किंमत 35 लाख रुपये आहे. Kawasaki Ninja H2 मध्ये 998cc, इनलाइन 4 सिलिंडर इंजिन आहे, जे 228 hp पावर आणि 142 Nm मॅक्सिमम टॉर्क जनरेट करते. यात MotoGP इंस्पायर्ड 6 स्पीड ट्रांसमिशन युनिट आहे.
Harley-Davidson Fat Boy-धोनीच्या फार्महाउसवर Harley-Davidson Fat Boy देखील पाहण्यात आली आहे. यात 1,690 cc एयर कूल्ड, V-Twin इंजिन आहे, जे 77 hp पॉवर आणि 132 Nm मॅक्सिमम टॉर्क जनरेट करते. याची भारतातील किंमत 17 लाख रुपये आहे.
Yamaha RD350-असे म्हटले जाते की, धोनीची सर्वात पहिली बाईक Yamaha RD350 आहे. काही रिपोर्ट्सनुसार, धोनीला ही गाडी इतकी आवडते की, त्याने Yamaha RD350 चे सहा मॉडेल्स खरेदी केले आहेत.
Ducati 1098-धोनीकडे ड्युकाटी 1098 देखील आहे, ज्याची किंमत ₹25 लाख रुपये आहे. या लिमिटेड एडिशन बाईकमध्ये 1098 सीसी इंजिन आहे, जे 160 पीएस एनर्जी जनरेट करते.
याशिवाय, धोनीकडे इतर अनेक लक्झरी बाईक्स आहेत, ज्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. यावरुनच तुम्हाला धोनीचे बाईक्सप्रेम कळेल. धोनी अनेकदा रांचीमध्ये आपल्या बाईकवर फेरफटका मारताना दिसतो.