MI न्यूयॉर्कच्या संघाने मेजर लीग क्रिकेट (MLC) २०२५ स्पर्धेतील फायनल जिंकत जेतेपदावर नाव कोरले. मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघाच्या या विजयासह या ताफ्यातून खेळणाऱ्या कॅरेबियन स्टार केरॉन पोलार्डनं वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी साधली आहे.
३८ वर्षीय केरॉन पोलार्ड आता संयुक्तरित्या सर्वाधिक टी-२० फायनल जिंकणारा खेळाडू ठरला आहे.
एक नजर टाकुयात केरॉन पोलार्ड ते रोहित शर्मा यांच्यासह टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक फायनल जिंकणाऱ्या खेळाडूंच्या खास रेकॉर्डवर
केरॉन पोलार्डनं आतापर्यंत ३० टी-२० फायनल खेळला असून १७ व्या वेळी त्याने फायनल जिंकली आहे.
पोलार्डनं आपलाच सहकारी ड्वेन ब्रावो याच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केलीये. ब्रावोनं २६ टी-२० सामन्यातील फायनलमध्ये १७ वेळा विजय मिळवला आहे.
पाकिस्तानी शोएब मलिकचाही या यादीत समावेश आहे. त्याने २२ पैकी १६ टी-२० फायनल जिंकल्याचा रेकॉर्ड आहे.
हिटमॅन रोहित शर्मानं १८ वेळा टी-२० फायनल खेळताना ११ वेळा विजय मिळवल्याची नोंद आहे.
कॅरेबियन अष्टपैलू सुनील नरेनही टॉप ५ मध्ये आहे. त्याने १२ टी-२० फायनलमध्ये ११ वेळा त्याने बाजी मारली आहे.