IPL 2025 : यंदाच्या हंगामातील सिक्सर किंग कोण? इथं पाहा टॉप ५ मध्ये असलेल्या बॅटर्सचा रेकॉर्ड

एक नजर यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांवर...

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात LSG च्या ताफ्यातून निकोलस पूरन याने धमाकेदार सुरुवात केली.

मधल्या टप्प्यात त्याची कामगिरी घसरली, पण तरीही तो यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी आहे.

निकोलस पूरन याने LSG कडून खेळताना १३ सामन्यात ४० षटकार मारले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात तो यात आणखी भर घालू शकतो.

सध्याच्या घडीला निकोलस पूरन हा सिक्सर किंग असला तरी त्याला मागे टाकून सूर्यकुमार यादवसह श्रेयस अय्यरकडे नंबर वन होण्याची संधी आहे. एक नजर टाकुयात कुणी किती षटकार मारलेत त्या रेकॉर्डवर

LSG च्या संघाच्या डावाची सुरुवात करणारा मिचेल मार्श या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने १२ सामन्यात ३२ षटकार मारले आहेत.

मुंबई इंडियन्सच्या संघाकडून सातत्यपूर्ण खेळी करताना सूर्यकुमार यादवनं १४ सामन्यात ३२ षटकार मारले आहेत. MI चा संघ फायनलपर्यंत पोहचला तर तो या यादीत अव्वलस्थानी पोहचू शकतो.

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर याने १४ सामन्यात ३१ षटकार मारले आहेत. प्लेऑफ्समध्ये पंजाबचा संघ किमान दोन सामने खेळणार हे निश्चित झालंय. त्यामुळे त्यालाही यंदाच्या हंगामातील सिक्सर किंग होण्याची संधी आहे.

अभिषेक शर्मानं १४ सामन्यातील १३ डावात २८ षटकार मारले आहेत. तो या यादीत पाचव्या स्थानावर आहे.