भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ ( Mohammad Kaif) याच्या पत्नीची सोशल मीडियावर हवा झाली आहे.
मागील काही दिवसांपासून मोहम्मद कैफनं त्याच्या पत्नीसोबतचे काही फोटो पोस्ट केले अन् त्याच्या पत्नीच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली.
पूजा यादव असे कैफच्या पत्नीचे नाव आहे. पूजा ही नोएडा येथील पत्रकार आहे आणि २५ मार्च २०११मध्ये दोघांनी एकमेकांशी लग्न केलं.
एका कॉमन मित्राच्या पार्टीत २००७मध्ये या दोघांची भेट झाली आणि पाहता क्षणी ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली. या दोघांनी चार वर्ष एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.
२८ फेब्रुवारी २०१२मध्ये त्यांना मुलगा झाला अन् त्याचे नाव कबीर असे ठेवले, त्यानंतर एप्रिल २०१७मध्ये त्यांच्या घरी कन्येचा जन्म झाला. इवा असे तिचे नाव आहे.
मोहम्मद कैफनं १३ कसोटी व १२५ वन डे सामन्यांत अनुक्रमे ६२४ व २७५३ धावा केल्या आहेत.