Join us

'बचपन का प्यार'... कुंडली अन् गुण नव्हे तर क्रिकेटच्या मैदानातील Stats जुळणाऱ्या पॉवर कपलची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:25 IST

Open in App
1 / 9

ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीये. त्याच्या या निर्णयानंतर त्याची पत्नी अन् ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर एलिसा एलिसा हेली हिने इन्स्टाच्या माध्यमातून खास पोस्ट शेअर करत आपल्या जोडीदाराच्या छोट्या फॉरमॅटमधील मोठ्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.

2 / 9

मिचेल स्टार्क अन् एलिसा हिली लोकप्रिय क्रिकेटर आहेत. आपापल्या देशाचे प्रतिनिधीत्व करताना दोघांनी खास छाप सोडली आहे.

3 / 9

या पॉवर कपलची लव्ह स्टोरी एकदम खास आहे. कुंडली अन् गुण जुळले की परफेक्ट जोडी जमते, हे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. पण तुम्हाला पटणार नाही क्रिकेटचं मैदान गाजवताना या नवरा बायकोच्या जोडीचे आकडे परफेक्ट मॅचिंग कपलची एक वेगळी केमस्ट्री दाखवून जातात.

4 / 9

वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी या दोघांची पहिली भेट झाली ती क्रिकेटच्या मैदानात. सिडनीतील नॉर्दन आंतरजिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये ते एकमेकांच्या विरुद्ध मैदानात उतरले होते. मग भेटीगाठीचा सिलसिल्यासह मैत्री फुलली अन् या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं.

5 / 9

९ वर्षे मैत्री जपल्यावर वयाच्या १८ व्या वर्षी दोघांच्यात प्रेमाचा खेळ रंगला. डेटिंग सेटिंग अन् मग लग्नाचंही गाणं वाजलं. २०१६ मध्ये ही जोडी लग्नबंधनात अडकली होती.

6 / 9

मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियन पुरुष संघाचे तर एलिसा हिली महिला क्रिकेट संघाचे प्रतिनीधीत्व करते. दोघांनी मिळून १२ आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. यात ११ वर्ल्ड कपचा समावेश आहे.

7 / 9

मिचेल स्टार्क ( २०१३ विरुद्ध टीम इंडिया) अन् एलिसा हिली (२०२४ विरुद्ध दक्षिण आफ्रिका) दोघांची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या ही ९९ आहे. एवढेच नाही तर दोघांनीही नववा कसोटी सामना खेळताना ही कामगिरी केली होती.

8 / 9

या दोघांनी एकाच दिवशी ऑस्ट्रेलियाकडून २८७ वा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्याचाही कमालीचा रेकॉर्ड आहे.

9 / 9

क्रिकेटच्या मैदानात आपली खास छाप सोडणारी ही जोडी गोल्फ खेळण्यासाठी एकमेकांविरुद्ध मैदानात उतरते. जो जिंकेल त्याला कप मिळतो. एकमेकांवरील प्रेम अन् प्रतिस्पर्धीत्व जपण्याचा ते मांडत असणारा खेळ ही गोष्ट दोघांच्या नात्यातील एक खास गोष्ट दाखवून देणारी अशीच आहे.

टॅग्स :टी-20 क्रिकेटआॅस्ट्रेलियाऑफ द फिल्ड