Join us

Big news : Kieron Pollard, ड्वेन ब्राव्हो व निकोलस पूरन मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसणार; MI Emirates ने जाहीर केला १४ खेळाडूंचा संघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 13:59 IST

Open in App
1 / 5

MI Emirates, today announced team : मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने UAE आणि दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमध्ये फ्रँचायझी खरेदी केल्यानंतर त्यांच्या संघातून कोण खेळणार याची सर्वांना उत्सुकता होती. 'MI Emirates' या नावाने यूएई आंतरराष्ट्रीय लीगमध्ये फ्रँचायझी मैदानावर उतरणार आहे, तर आफ्रिकेतील लीगमधील संघाचं नाव 'MI Cape Town' असे असणार आहे. काल MI Cape Town संघाने त्यांच्या ५ प्रमुख खेळाडूंची नावे जाहीर केली. आज MI Emirates फ्रँचायझीने १४ सदस्यीय संघच जाहीर केला.

2 / 5

MI Cape Town संघाने ३ परदेशी, दक्षिण आफ्रिकेचा १ कॅप्ड व आफ्रिकेच्या १ अनकॅप्ड खेळाडूला करारबद्ध केले आहे. कागिसो रबाडा, अफगाणिस्तानचा राशिद खान, इंग्लंडचा लिएम लिव्हिंगस्टोन व सॅम कुरन आणि आफ्रिकेचा अनकॅप्ड खेळाडू डेवॉल्ड ब्रेव्हिस यांना करारबद्ध केल्याची घोषणा रिलायन्सन जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी केली. ते म्हणाले,''MI Cape Town संघाच्या बांधणीला आम्ही सुरुवात केली आहे. राशिद, कागिसो, लिएम, सॅम यांचा #OneFamily संघात स्वागत करतो. डेवॉल्ड ब्रेव्हिस याही प्रवासात आमच्यासोबत असल्याचा आनंद आहे.''

3 / 5

आज मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने १४ सदस्यीय संघ जाहीर केला. यात किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, निकोलस पूरन हे वेस्ट इंडिजचे स्फोटक फलंदाज MI Emirates संघातून दिसणार आहेत. ट्रेंट बोल्टही MI च्या ब्लू जर्सीत पुन्हा दिसणार आहे. आकाश अंबानी म्हणाले की, १४ सदस्यीय तगडा संघ जाहीर करताना मला आनंद होतोय. किरॉन पोलार्ड हा MI कुटुंबात कायम राहिल आहे. ब्राव्हो, ट्रेंट बोल्ट व निकोल पूरन हेही कुटुंबात आले आहेत. या सर्वांचे स्वागत. अनुभवी व युवा खेळाडूंचा ताळमेळ कसा राखायचा हे MI ला चांगले माहित्येय.

4 / 5

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या The Hundred लीगला पहिला शतकवीर बुधवारी मिळाला. बर्मिंगहॅम फोनिक्स ( Birmingham Phoenix) विरुद्ध साउदर्न ब्रेव्ह ( Southern Brave) यांच्यातल्या सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी झाली. २० वर्षीय विल स्मीदने या लीगमधील पहिल्या शतकवीराचा मान पटकावताना साउदर्न ब्रेव्ह संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने ५० चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावा केल्या.त्याला मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले आहे.

5 / 5

MI Emiratesचा संघ - किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, निकोलस पूरन, ट्रेंट बोल्ट, अँड्य्रू फ्लेचर, इम्रान ताहीर, समित पटेल, विल स्मीद, जॉर्डन थॉम्पसन, नजिबुल्लाह झाद्रान, झहीर खान, फझलहक फारूकी, ब्रॅडली व्हिल, बॅस डे लीड

टॅग्स :मुंबई इंडियन्सकिरॉन पोलार्डड्वेन ब्राव्होसंयुक्त अरब अमिराती
Open in App