Join us

क्रिकेटपटूसोबत लग्न केले आणि या पाच सुंदर अभिनेत्रींचे करिअर संपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 13:58 IST

Open in App
1 / 6

क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते खूप जुने आहे. तसेच क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या अनेक प्रेम कहाण्याही प्रसिद्ध आहेत. यापैकी अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींना आपली जीवनसंगिनी बनवले. विवाहानंतर अनेक क्रिकेटपटूंच्या अभिनेत्री पत्नी मैदानात आपल्या पतींचा उत्साह वाढवताना दिसतात. मात्र यापैकी अनेक अभिनेत्रींचे फिल्मी करिअर विवाहानंतर जवळपास संपुष्टात आले आहे.

2 / 6

शैलीदार फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन आणि अभिनेत्री संगीता बिजलानी यांचे प्रेमप्रकरण त्याकाळी खूप गाजले होते. नंतर अझहरने संगीता बिजलानीसोबत विवाह केला होता. विवाहानंतर संगीता बिजलानीची चित्रपट कारकीर्द उतरणीला लागली होती. अझहरसोबतचे तिचे नातेही फार काळ टिकले नाही २०१० मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.

3 / 6

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू सिक्सर किंग युवराज सिंग याने २०१६ मध्ये अभिनेत्री हेझल किच सोबत विवाह केला. हेझल २०१६मध्ये बांके की क्रेझी बारात सिनेमात आयटम डान्स करताना दिसली होती. त्यानंतर तिने कुठल्याही चित्रपटात काम केले नाही.

4 / 6

भारताचा माजी स्टार गोलंदाज झहीर खान याने २०१७ मध्ये सागरिका घाटगे हिच्याशी विवाह केला. विवाहानंतर सागरिका बॉलिवूड चित्रपटांमध्ये फारशी दिसली नाही.

5 / 6

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याने सर्बिन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टँकोविचसोबत गतवर्षी विवाह केला होता. नाताशा गतवर्षी एका वेवसिरीजमध्ये दिसली होती. मात्र नंतर ती अभिनयापासून दूर झाली.

6 / 6

टर्बनेटर हरभजन सिंगने २०१५ मध्ये अभिनेत्री गीता बसरासोबत लग्न केले होते. गीताने २०१६मध्ये पंजाबी चित्रपट लॉकमध्ये काम केले होते. त्यानंतर ती कुठल्या चित्रपटात दिसली नाही.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबॉलिवूडयुवराज सिंगझहीर खानसागरिका घाटगेहार्दिक पांड्याहरभजन सिंग