भारतीय संघाचा खेळाडू लोकेश राहुल आणि अथिया शेट्टी विवाहबंधात अडकले आहेत. 23 जानेवारीला दोघांचे लग्न झाले.
राहुल-अथियाच्या लग्नाचे फोटो यापूर्वीच समोर आले आहेत. मात्र, आता खुद्द लोकेश राहुलने लग्नातील काही Unseen Photo फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
राहुलने 'सुख' अशा आशयाचे ट्विट करत हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नवदाम्पत्यांने रोमॅंटिक पोज दिल्या आहेत.
केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. यावेळी या दोघांच्यात पहिल्यांदा संभाषण झाले होते.
यानंतर दोघांची मैत्री सुरू झाली. पुढे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही नेहमीच चर्चेत असतात, पण असे असतानाही दोघांनीही आपले नाते गुपित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
रिलेशनशिपमध्ये असूनही दोघेही जवळपास दीड वर्ष एकमेकांसोबत कधीही दिसले नाहीत, दोघांनी कधीही एकत्र फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले नव्हते.
18 एप्रिल 2020 रोजी अथियाने केएल राहुलला त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या होत्या. अथियाने दोघांच्या फोटोसह लिहिले होते, 'हॅपी बर्थडे माय पर्सन.' तेव्हापासूनच यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती.