Join us  

Kane Williamson becomes Father : केन विल्यमसन दुसऱ्यांदा झाला बाबा! बाळाचा फोटो शेअर करत दिली 'गूड न्युज'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 4:32 PM

Open in App
1 / 6

Kane Williamson becomes Father: IPL 2022 मधील शेवटच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात केन विल्यमसनचा समावेश नव्हता.

2 / 6

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार आपल्या दुसऱ्या बाळाच्या जन्माच्या वेळी पत्नीजवळ राहावं या दृष्टीने मायदेशात परतला होता. नुकताच केन विल्यमसन दुसऱ्यांदा बाबा झाला.

3 / 6

२२ मे रोजी केन विल्यमसनने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून घोषणा केली की त्याची जोडीदार सारा रहीमने मुलाला जन्म दिला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

4 / 6

IPL 2022 ची साखळी फेरी संपण्याआधीच विल्यमसन मायदेशी परतला. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादच्या शेवटच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने संघाचे नेतृत्व केले.

5 / 6

केन विल्यमसनने त्याच्या इन्स्टाग्रामवर कुटुंबासह फोटो शेअर केला आणि लिहिले की whnau छोट्या माणसाचे स्वागत आहे.

6 / 6

केन आणि सारा यांचे हे दुसरे अपत्य आहे. याआधी दोघांना मॅगी नावाची मुलगी आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२केन विल्यमसनसनरायझर्स हैदराबादइन्स्टाग्रामसोशल मीडिया
Open in App