Join us
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल क्रश स्मृती मानधना बॉलिवूड singerच्या भावाच्या प्रेमात? त्या फोटोंमुळे रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 16:43 IST

Open in App
1 / 7

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिचे बॉलिवूड कनेक्शन समोर आले आहे. स्मृतीने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बॉलिवूड दिग्दर्शक, संगीतकार आणि गायक पलाश मुच्छाल याच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

2 / 7

हे फोटो समोर आल्यापासून स्मृती आणि पलाश एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. पलाश हा बॉलिवूड गायिका पलक मुच्छालचा भाऊ आहे. अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पलाशसोबतचे काही फोटो शेअर करताना स्मृतीने लिहिले की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा चांगल्या मनाच्या व्यक्ती. तुझे वर्ष चांगले जावो.

3 / 7

या फोटोंमध्ये स्मृती काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे, तर पलाश काळ्या रंगाची पँट आणि पांढऱ्या शर्टमध्ये दिसत आहे. स्मृतीच्या या पोस्टवर जेमिमा रॉड्रिग्स आणि हरलीन देओलसह भारतीय महिला क्रिकेट संघाच्या इतर अनेक खेळाडूंनी कमेंट केल्या आहेत.

4 / 7

ही पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक चाहत्यांनी त्यांना कमेंट सेक्शनमध्ये या दोघांना लव्ह बर्ड म्हणून घोषित केले आहे. यासोबतच दोघे लग्न कधी करणार आहेत, अशी विचारणाही केली जात आहे.

5 / 7

एका चाहत्याने 'तुम्ही दोघांच्या लग्नाची वाट पाहतोय' अशी कमेंट केली. तर एकाने लिहिले की, 'हे पाहून माझे हृदय तुटले.' एका युजरने तर 'सॉरी स्मृती पण तू यापेक्षा चांगल्या व्यक्तिस पात्र आहेस' असे लिहिले.

6 / 7

स्मृती आणि पलाश एकत्र दिसण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही स्मृतीच्या बर्थडे पार्टीतील तिचे आणि पलाशचे काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये पलाश स्मृतीला केक खाऊ घालताना दिसत होता. याशिवाय स्मृती पलाशची बहीण पलक मुच्छाल आणि तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत अनेक प्रसंगांमध्ये दिसली आहे.

7 / 7

पलाशने 'डिशकियाँ' चित्रपटाद्वारे संगीतकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अमिताभ बच्चन स्टारर 'भूतनाथ रिटर्न्स' या चित्रपटातील 'पार्टी तो बनाती है' हे प्रसिद्ध गाणेही त्यांनी संगीतबद्ध केले. नुकतेच पलाशने 'अर्ध' या चित्रपटातून दिग्दर्शनातही पदार्पण केले आहे.

टॅग्स :स्मृती मानधनाभारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्डसोशल व्हायरल
Open in App