Join us

सचिन ते सूर्या! इथं पाहा MI साठी एका हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांचा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 18:46 IST

Open in App
1 / 10

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या हंगामात सचिन तेंडुलकरचा जवळपास २५ वर्षे अबाधित असलेला विक्रम मोडण्याच्या तो अगदी जवळ पोहचलाय.

2 / 10

मुंबई इंडियन्सकडून एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम हा सचिन तेडुंलकरच्या नावे आहे. २०१० च्या हंगामात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं MI कडून सर्वाधिक धावा केल्या होत्या.

3 / 10

सूर्यकुमार यादवनं तीन अर्धशतकासह १३ सामन्यात ६०० धावसंख्येचा टप्पा पार केला असून सचिनला ओव्हरटेक करण्यासाठी त्याला फक्त १८ धावा करायच्या आहेत. साखळी फेरीतील एका सामन्यासह MI प्लेऑफ्ससाठी पात्र ठरल्यामुळे सूर्या भाऊ सहज नवा रेकॉर्ड प्रस्थापित करू शकतो.

4 / 10

इथं एक नजर टाकुयात मुंबई इंडियन्सकडून एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या खास रेकॉर्ड्सवर

5 / 10

२०१० च्या हंगामात सचिन तेंडुलकरनं १५ सामन्यात ५ अर्धशतकाच्या मदतीने ४७.५३ च्या सरासरीसह १३२.६१ च्या स्ट्राइक रेटनं ६१८ धावा केल्या होत्या. सचिननं या हंगामात ऑरेंज कॅपही पटकावली होती. त्यानंतर एकाही मुंबईकराला ऑरेंज कॅप जिंकता आलेली नाही.

6 / 10

२०२३ च्या हंगामातही सूर्यकुमार यादव सचिनच्या विक्रमाच्या जवळ पोहचला होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सूर्यानं या हंगामात १६ सामन्यात ६०५ धावा केल्या होत्या. आता पुन्हा तो ६०० पेक्षा अधिक धावा करून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. सचिनच्या विक्रम मागे टाकत ऑरेंज कॅप मिळवणारा तो दुसरा मुंबईकर ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.

7 / 10

२०११ च्या हंगामात सचिन तेंडुलकर ५५३ धावांसह मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉपर होता.

8 / 10

२०१५ च्या हंगामात लेन्डल सिमन्स याने मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ५४० धावा केल्या होत्या.

9 / 10

२०१३ च्या हंगामात रोहित शर्मानं ५३८ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. १९ सामन्यात ४ अर्धशतकाच्या मदतीने रोहितनं या धावा केल्याचे पाहायला मिळाले होते.

10 / 10

मुंबई इंडियन्सकडून एका हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या अन्य फलंदाजांच्या यादीत जयसूर्या (२००८-५१८ धावा), सूर्यकुमार यादव (२०१८-५१२ धावा), क्विंटन डिकॉक (२०१९-५२९ धावा), इशान किशन (२०२०-५१६ धावा) यांचा समावेश आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्ससूर्यकुमार अशोक यादवसचिन तेंडुलकररोहित शर्माइशान किशनक्विन्टन डि कॉक