IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?

Mumbai Indians New Joinee IPL 2026: दुखापतग्रस्त अथर्व अंकोलेकरच्या जागी मिळाली आला नवा 'भिडू'

IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्स संघ एका अजब दुष्टचक्रात अडकल्याचे दिसत आहे. मुंबईने हंगामातील पहिला सामना जिंकला, पण त्यानंतर तीन सामन्यात पराभूत झाले.

याचदरम्यान, मुंबई इंडियन्स संघात नवीन खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. दुखापतीमुळे माघार घेणाऱ्या अथर्व अंकोलेकरच्या जागी हा खेळाडू संघात आला आहे.

या नवीन खेळाडूचे नाव आहे क्रिश भगत. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असलेला तो हलक्या हाताने फलंदाजीही करतो आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळतो.

मुंबई इंडियन्सने क्रिश भगतला ३० लाख रुपयांना संघात घेतले आहे. मुंबई इंडियन्स हा त्याचा आयपीएलमधील पहिला संघ आहे. पण त्याचा RCBच्या जर्सीतही फोटो आहे.

मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्यापूर्वी, आरसीबीच्या जर्सीमध्ये क्रिश भगतचा विराट कोहलीसोबतचा एक फोटो समोर आला होता. गेल्या वर्षी हा फोटो शेअर झाला होता.

क्रिश भगतने अद्याप एकाही टी२० स्पर्धा खेळलेली नाही. पण त्याने ७ प्रथम-श्रेणी आणि ९ लिस्ट ए सामने खेळले आहेत. त्यात त्याने १६ बळी व १९७ धावा केल्या आहेत.

अथर्व अंकोलेकरच्या तुलनेत क्रिश भगत कमी अनुभवी आहे. सध्या तो मुंबई इंडियन्ससोबत नेट बॉलर म्हणून जोडला गेला होता. पण त्याला संधी केव्हा मिळते हे पाहावे लागेल.