Join us

तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 15:32 IST

Open in App
1 / 11

काही वर्षांपूर्वी स्थानिक क्रिकेट खेळत नाही म्हणून बीसीसीआयने श्रेयस अय्यरला घरी बसविले होते. याच श्रेयस अय्यरने पुन्हा स्थानिक सामने खेळ उभारी घेतली आणि एक दोन नाही तर तब्बल तीन संघांना त्याने आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचविले आहे. २०२० दिल्ली कॅपिटल, २०२४ केकेआर आणि आता २०२५ पंजाब किंग्स...

2 / 11

एकीकडे विराट कोहलीसारख्या खेळाडूला १५-१६ वर्षे झाली एकदाही फायनल जिंकता आली नाही. पण या पठ्ठ्याने दिल्लीला उपविजेतेपद, कोलकाताला विजेतेपद जिंकून दिले आहे.

3 / 11

काल मुंबईला हरवून अय्यरने पुन्हा एकदा फायनलमध्ये तंबू ठोकला आहे. ४१ चेंडूंत आठ सिक्स ठोकत ८७ रन्स झोडले आणि मुंबईचे फायनलमध्ये जाण्याचे स्वप्न हिरावून घेतले. या अय्यरचे मुंबईतच भलेमोठे घर आहे.

4 / 11

या अय्यरचा मुंबईतील लोढा वर्ल्ड टॉवर्समध्ये ४ बीएचके फ्लॅट आहे. त्याने हे घर २०२० मध्ये अंदाजे १२ कोटींना खरेदी केले होते.

5 / 11

कोलकाता नाईट रायडर्सचे दुर्दैव हे की आयपीएल जिंकवूनही त्याला त्यांनी सोडले. प्रिती झिंटाच्या पंजाब संघाने क्षणाचाही वेळ न दवडता २६.७५ कोटी रुपये मोजत अय्यरला आपल्या संघात घेतले. अन् आज तो तीन वेगवेगळ्या संघांसह आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला कर्णधार ठरला.

6 / 11

योगायोग असा की अय्यरने २०२० मध्ये घर घेतले आणि त्याला ते लाभले आहे, असे म्हणायला हरकत नाही. श्रेयस त्याच्या आईवडिलांसोबत आणि बहिणीसोबत या घरात राहतो.

7 / 11

या अपार्टमेंटमध्ये जिम, इनडोअर आणि आउटडोअर पूल, स्पा, खाजगी थिएटर आणि बॉलरूम अशा सर्व आधुनिक सुविधा देण्यात आलेल्या आहेत. समुद्राचा व्ह्यू, गगनचुंबी इमारत आणि घराचे इंटेरिअर या घराला आणखीन भव्य दिव्य बनविते. या घरात रोहित शर्मादेखील राहून गेलेला आहे.

8 / 11

श्रेयसचे क्रिकेट किट, शूज ठेवण्यासाठी एक रुम राखीव ठेवण्यात आला आहे. श्रेयस सोशल मीडियावर अधून मधून घरातील फोटो टाकत असतो. यावरून हे फोटो घेण्यात आले आहेत.

9 / 11

अय्यर कुटुंब मुळचे तामिळ आणि केरळचे रहिवासी असले तरी श्रेयसचा जन्म मुंबईच्या चेंबुरचा. माटुंगा येथील डॉन बॉस्को हायस्कूल आणि पोदार कॉलेज मधून अय्यरने शिक्षण पूर्ण केले आहे.

10 / 11

श्रेयस १८ वर्षांचा असताना शिवाजी पार्क जिमखान्यात प्रशिक्षक प्रवीण अमरे यांच्या नजरेत आला आणि त्याला आकार मिळाला. सुरुवातीच्या काळात वीरेंद्र सेहवागशी त्याची तुलना केली जायची. पण आता श्रेयसने आपले स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.

11 / 11

श्रेयसचे दुर्दैव की मु्ंबई इंडियन्सचे... श्रेयस मुंबईचा, मुंबईत जन्मलेला पण मुंबई इंडियन्सचा होऊ शकला नाही. दिल्लीने पहिली चूक केली, उपविजेत्या कर्णधाराला सोडले. दुसरी चूक कोलकाताने केली... पंजाब यातून धडा घेईल का... पुढील हंगामात हे स्पष्ट होईलच, पण भविष्यात रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईतही दिसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

टॅग्स :श्रेयस अय्यरकिंग्स इलेव्हन पंजाबआयपीएल २०२४इंडियन प्रिमियर लीग २०२५