IPL 2022, MI Playing XI vs DC : Suryakumar Yadav दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाही खेळणार?, Mumbai Indiansच्या Playing XI मध्ये बघा कोण कोण असणार!

IPL 2022, MI Playing XI vs DC पाच वेळेचे विजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा सामना करावा लागणार आहे. पण, या सामन्यात त्यांना सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याच्याशिवाय मैदानावर उतरावे लागणार आहे.

Suryakumar Yadav Likely To Miss First Match : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला २६ मार्चपासून चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स ( CSK vs KKR) या मागील फायनलिस्टमधील लढतीने सुरुवात होणार आहे. पाच वेळेचे विजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा सामना करावा लागणार आहे. पण, या सामन्यात त्यांना सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याच्याशिवाय मैदानावर उतरावे लागणार आहे.

रोहित शर्मा , जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सोमवारी रात्रीच दाखल झाले, तर विराट कोहलीही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बायो बबलमध्ये आला. मुंबईचा महत्त्वाचा व रोहित शर्माचा ( Rohit Sharma) खास खेळाडू सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हा २७ मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत खेळणार नसल्याची शक्यता बळावली आहे.

मुंबई इंडियन्सने ताफ्यात रिटेन केलेल्या खेळाडूंपैकी सूर्यकुमार यादव हा एक आहे. त्यामुळे तो मुंबईसाठी खूप महत्त्वाचा फलंदाज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत दुखापत झाली होती आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली होती.

मुंबई इंडियन्सने ताफ्यात रिटेन केलेल्या खेळाडूंपैकी सूर्यकुमार यादव हा एक आहे. त्यामुळे तो मुंबईसाठी खूप महत्त्वाचा फलंदाज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत दुखापत झाली होती आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली होती.

''सूर्यकुमार यादव सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरण्यासाठी गेला आहे. तो दुखापतीतून सावरत आहे, परंतु आयपीएल २०२२च्या पहिल्या सामन्याला खेळण्याची शक्यता फार कमी आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याला सलामीचा सामना खेळून दुखापतीबाबत उगाच धोका पत्करू नकोस, असा सल्ला देऊ शकते.''असे BCCIच्या सूत्रांनी PTIला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

२७ मार्चनंतर मुंबई इंडियन्स दुसरा सामना २ एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. सूर्यकुमारला अंगठ्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी अतिरिक्त पाच दिवस मिळत आहेत. त्यामुळे तो दुसरा सामना नक्की खेळेल, असा विश्वास बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने व्यक्त केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला होता. आयपीएलमध्ये त्याने ११५ सामन्यांत २३४१ धावा केल्या आहेत आणि त्यात १३ अर्धशतकांचा समावेश आहे.

मुंबई इंडियन्सला A गटात स्थान दिले गेले असून त्यांच्यासोबत दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे या गटात आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता, राजस्थान, दिल्ली, लखनौ व चेन्नई यांच्याशी दोनवेळा भिडणार, तर हैदराबाद, बंगळुरू, पंजाब व गुजरात यांच्याविरुद्ध एकच सामना खेळणार आहे.

सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यात नसल्याने मुंबईची मधली फळी थोडी कमकुवत होऊ शकते. रोहित शर्मा व इशान किशन ही जोडी सलामीला खेळेल. तिसऱ्या क्रमांकासाठी मुंबई इंडियन्स १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघातील डावखुरा फलंदाज तिलक वर्मा याला संधी देऊ शकतात. त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सने १.७० कोटी रुपये मोजले आहेत.

त्यानंतर डेवॉल्ड ब्रेव्हिस, टीम डेव्हिड व किरॉन पोलार्ड हे तगडे हिटर मुंबई इंडियाच्या धावांचा वेग वाढवण्यासाठी सज्ज आहेत. त्यानंतर तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू संजय यादव हा खेळू शकतो. गोलंदाजी विभागात जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन किंवा मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह व टायमल मिल्स हे जबाबदारी सांभाळतील.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, इशान किशन ( १५.२५ कोटी), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ३कोटी), बासील थम्पी ( ३० लाख), मुरुगन अश्विन ( १.६० कोटी), जयदेव उनाडकट ( १.३० कोटी), मयंक मार्कंडे ( ६५ लाख) , एन तिलक वर्मा ( १.७० कोटी), संजय यादव ( ५० लाख), जोफ्रा आर्चर ( ८ कोटी), डॅनिएल सॅम्स ( २.६० कोटी), टायमल मिल्स ( १.५० कोटी) ,टीम डेव्हिड ( ८.२५ कोटी), अनमोलप्रीत सिंग ( २० लाख), रमणदीप सिंग ( २० लाख), आर्यन जुयल ( २० लाख), रिले मेरेडिथ ( १ कोटी), मोहम्मद अर्षद खान ( २० लाख), हृतिक शोकीन ( २० लाख), फॅबियन अॅलन ( ७५ लाख), आर्यन जुनाल ( २० लाख), अर्जुन तेंडुलकर ( ३० लाख), राहुल बुद्धी ( २० लाख).