Join us

IPL 2021, MI Vs KKR : हारी बाज़ी को जीतना हमे आता है!; अखेरच्या षटकांत गेम पलटला, MIनं गमावलेला सामना असा जिंकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 07:15 IST

Open in App
1 / 7

IPL 2021 : MI Vs KKR  T20 Live Score Update : अखेरच्या सहा षटकांत ४० धावांची गरज, ही ट्वेंटी-२० सारख्या झटपट क्रिकेटमध्ये सोपी गोष्ट म्हणावी लागेल. अशा परिस्थिती लक्ष्याचा बचाव करणारा संघानं हार मानली, तर त्याचं नवल वाटायला नको. पण, मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) त्याला अपवाद ठरले.

2 / 7

१५व्या षटकात राहुल चहरनं ९ धावा देताना MIला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. त्यानं त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सेट फलंदाज नितीश राणाला ( ५७) बाद केले. क्रीज सोडून पुढे गेलेल्या नितीशला बाद करण्याची आयती संधी यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकनं गमावली नाही.

3 / 7

१६व्या षटकात कृणाल पांड्यानं दुसऱ्याच चेंडूवर KKRच्या शाकिब अल हसनला ( ९) बाद करून मोठा धक्का दिला. पण, पुढच्याच चेंडूवर कृणालनं KKRचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल याचा झेल सोडला. हा सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरेल असेच वाटले होते. जीवदान मिळाल्यानंतर रसेल थोडा सावध खेळला. त्या षटकात KKRला एकच धाव मिळाली.

4 / 7

१७व्या षटकात जसप्रीत बुमराहनं ८ धावा दिल्या. त्यातील चार धावा या फ्री हिटवर आल्या. त्यामुळे अखेरच्या तीन षटकांत २२ धावा KKRला करायच्या होत्या. यात रोहित शर्मानंही आक्रमक क्षेत्ररक्षण लावताना KKRच्या फलंदाजांवर दडपण निर्माण केलं.

5 / 7

१८व्या षटकात कृणालच्या गोलंदाजीवर रसेलला ( ५ धावांवर) जसप्रीतनं जीवदानं दिलं. आता रसेल घाबरत घाबरतचं खेळला. बॅट आणि चेंडू यांचा ताळमेळ त्याला राखता आलाच नाही. त्या षटकात तीनच धावा त्यांना करता आल्या.

6 / 7

१९व्या षटकात बुमराहनं ४ धावा दिल्या आणि अखेरच्या षटकात KKRला १५ धावांची गरज होती. ट्रेंट बोल्टच्या अखेरच्या षटकांत पहिल्या दोन चेंडूंत दोन धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवर बोल्टनं रसेलला बाद केलं. पुढच्याच चेंडूवर त्यानं पॅट कमिन्सचा त्रिफळा उडवला. कोलकाताला ७ बाद १४२ धावाच करता आल्या. मुंबईनं १० धावांनी हा सामना जिंकला.

7 / 7

मुंबई इंडियन्सच्या १५२ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सला ७ बाद १४२ धावा करता आल्या. मुंबईनं अखेरच्या पाच षटकांत सात विकेट्स गमावले होते.

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सजसप्रित बुमराहक्रुणाल पांड्यासूर्यकुमार अशोक यादवकोलकाता नाईट रायडर्स