Join us

IPL 2020 : जेव्हा सुपर ओव्हरमध्ये निकाल लागले, KXIP व DC संघांनी नोंदवला विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 16:36 IST

Open in App
1 / 11

टी-20 सामन्यांच्या सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी हे सर्वात कमी धावांचे लक्ष्य राहिले. त्यानंतर मोहम्मद शामीच्या वाईड चेंडूनंतर ऋषभ पंतने दोन धावा घेऊन दिल्लीला विजय मिळवून दिला. आयपीएलच्या इतिहासातील सुपर ओव्हरमध्ये गेलेला हा दहावा सामना होता. किंग्ज इलेव्हन पंजाब व दिल्ली दोघांसाठीही हा तिसरा सुपर ओव्हरचा सामना होता. योगायोगाने ज्या किंग्ज इलेव्हनने त्यांचे आधीचे दोन्ही सुपर ओव्हरचे सामने जिंकले होते त्यांनी हा गमावला. कोलकाता नाईट रायडर्सने आपले सुपर ओव्हरचे तिन्ही सामने गमावले आहेत.

2 / 11

1) राजस्थान रॉयल्स वि.वि. कोलकाता नाईट रायडर्स , 23 एप्रिल 2009, केपटाऊन - केकेआरने पंजाबप्रमाणेच शेवटच्या दोन चेंडूत दोन विकेट गमावल्याने सामना 'टाय' झाला. सुपर ओव्हरमध्ये राजस्थान राॕयल्सला 16 धावांचे लक्ष्य मिळाले जे युसूफ पठाणने 6,2,6,4 असे फटके मारुन चार चेंडूतच गाठून दिले.

3 / 11

2) किंग्ज इलेव्हन पंजाब वि.वि. चेन्नई सुपर किंग्ज, 12 मार्च 2010, चेन्नई - धोनीच्या गैरहजेरीत सीएसकेला घरच्या मैदानावर 137 धावांचे लक्ष्यसुध्दा कठीण ठरले. ते 1 बाद 96 वरुन7 बाद 136 वर अडकले आणि सुपर ओव्हरमध्ये पंजाबने 10 धावा करुन त्यांना घरच्या मैदानावर मात दिली.

4 / 11

3) सनरायझर्स हैदराबाद वि.वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 7 एप्रिल 2013, हैदराबाद - विनयकुमारने अखेरच्या षटकात हैदराबादच्या फलंदाजांना फक्त सहाच धावा घेऊ दिल्याने सामना टाय झाला. मात्र त्यानंतर कॅमेरॉन व्हाईटने सुपर ओव्हरमध्ये दोन षटकारांसह 20 धावा करुन बंगळुरूपुढे अवघड आव्हान ठेवले आणि बंगलोर पाच धावांनी कमी पडले.

5 / 11

4) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि.वि. दिल्ली डेअरडेवील्स, 16 एप्रिल 2013, बंगळुरू - एकाच मोसमातला बंगलोरसाठीचा हा दुसरा टाय सामना आणि यावेळी निकाल त्यांच्या बाजूने. दोन्ही संघांची धावसंख्या 153 राहिली. सुपर ओव्हरमध्ये रवी रामपॉलने दोन विकेट घेत बंगलोरला विजय दाखवला.

6 / 11

5) राजस्थान रॉयल्स वि. वि. कोलकाता नाइट रायडर्स, 29 एप्रिल 2014, अबुधाबी - या दोन संघातील हा दुसरा टाय सामना. केकेआरला विजयासाठी 12 चेंडूत 16 धावा आणि सहा गडी हाताशी या समीकरणात रॉयल्सच्या जेम्स फाॕकनरने तीन विकेट काढून सामना फिरवला. सुपर ओव्हरमध्येही टाय झाली. दोन्ही संघांनी सारख्याच 11 धावा केल्या पण राजस्थानला बाउंडरी काउंटबॕक नियमाने विजय मिळवून दिला.

7 / 11

6) किंग्ज इलेव्हन पंजाब वि.वि. राजस्थान रॉयल्स, 21 एप्रिल 2015, अहमदाबाद - अक्षर पटेलच्या चौकाराने धावसंख्या 192 च्या बरोबरीवर आणली. सुपर ओव्हर मध्ये पंजाबच्या शॉन मार्शने जेम्स फॉकनरला लागोपाठ तीन चौकार लगावले. त्यानंतर राजस्थानने तीन चेंडूतच दोन गडी गमावल्याने सामना आटोपला.

8 / 11

7) मुंबई इंडियन्स वि.वि. गुजराथ लायन्स, 29 एप्रिल 2017, राजकोट - रविंद्र जडेजाने दोन थेट फेकी करुन जसप्रीत बुमरा व कृणाल पंड्या यांना धावबाद केले. पंड्या धावबाद होताच सामना टाय झाला पण नंतर बुमराने गुजरातला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 12 धावासुध्दा जमवू दिल्या नाहीत.

9 / 11

8) दिल्ली कॅपिटल्स वि. वि. कोलकाता नाइट रायडर्स, 30 एप्रिल 2019, दिल्ली - आंद्रे रसेलच्या फटकेबाजीमुळे केकेआरने 185 धावा केल्या. पण पृथ्वी शॉच्या 54 चेंडूत 99 धावांनी सामना टाय सोडवला. त्यानंतर कासिगो रबाडाच्या यार्कर्सनी केकेआरला सुपरओव्हरमध्ये 11 धावांचे लक्ष्यसुध्दा अवघड गेले.

10 / 11

9) मुंबई इंडियन्स वि.वि. सनरायजर्स हैदराबाद, 2 मे 2019, मुंबई - मनिष पांडेने हार्दिक पांड्याला शेवटच्या चेंडूवर षटकार मारुन सामना बरोबरीवर आणला. सुपर ओव्हरमध्ये मुंबईचा बुमराने फक्त आठ धावा दिल्या. त्यानंतर हार्दिक पांड्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारुन मुंबईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.

11 / 11

10) दिल्ली कॅपिटल्स वि.वि. किंग्ज इलेव्हन पंजाब, दुबई, 20 सप्टेंबर 2020 -मार्कस् स्टोईनीसने लागोपाठच्या चेंडूवर मयांक अगरवाल व ख्रिस जाॕर्डन यांना बाद करुन सामना 8 बाद 157 अशा सारख्याच धावसंख्येवर टाय केला. त्यानंतर दिल्लीच्या रबादाने सुपर औव्हरमध्ये पंजाबच्या लोकेश राहुल व निकोलस पूरन यांना लागोपाठ बाद केले आणि दिल्लीला फक्त तीन धावांचे आव्हान मिळाले जे त्यांनी दोनच चेंडूत गाठले.

टॅग्स :IPL 2020आयपीएलचेन्नई सुपर किंग्ससनरायझर्स हैदराबादरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्सकिंग्स इलेव्हन पंजाब