Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू प्रेमाच्या मैदानात क्लीन बोल्ड, प्रेयसीसोबत गुपचूप उरकला विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 23:26 IST

Open in App
1 / 6

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे आज विवाहबंधनात अडकला आहे. शिवम दुबे याने आज त्याची गर्लफ्रेंड अंजुम खान हिच्यासोबत विवाह केला. त्यानंतर शिवम दुबेने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून याची माहिती सर्वांना दिली. विवाहसोहळ्यात शिवम दुबे याने मुस्लिम रीतीरिवाजही पार पाडले. तसेच पत्नी अंजुम खान हिच्यासोबत दुवा मागितली.

2 / 6

विवाहाचे फोटो शेअर करताना शिवम दुबे म्हणाला की, आम्ही प्रेम केलं. ते प्रेमापेक्षाही अधिक होते. आता येथूनच आमची सुरुवात होत आहे.

3 / 6

यावेळी शिवम दुबे याने मुस्लिम रीतीरिवाजांनुसारही निकाह केला. तसेच पत्नी अंजुम खान हिच्यासोबत नमाजही अदा केली.

4 / 6

विवाहाची माहिती समोर आल्यावर शिवम दुबेचा सहकारी खेळाडू श्रेयस अय्यर याने त्याला शुभेच्छा दिल्या. शिवम दुबे आणि श्रेयस अय्यर देशांतर्गत स्पर्धांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतात.

5 / 6

मात्र शिवम दुबे सध्या भारतीय संघाच्या बाहेर आहे. त्याने भारतासाठी एक एकदिवसीय आणि १३ टी-२० सामने खेळले आहेत.

6 / 6

शिवम दुबेची एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय मध्ये १३.५ एवढी सरासरी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला गोलंदाजीत यश मिळालेले नाही. मात्र टी-२० मध्ये त्याने ५ बळी मिळवले आहेत. मात्र सुमार कामगिरीमुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर जावे लागले आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघलग्न