T20I मध्ये पहिल्या बॉलवर सिक्सर मारण्यात अभिषेक शर्मा माहिर! शाहीन आफ्रिदीलाही नाही सोडलं

आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात डावातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे भारतीय! अभिषेक शर्माच्या ठरलाय रोहित, संजू अन् यशस्वीपेक्षाही खतरनाक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या धर्मशाला मैदानात अभिषेक शर्मान लुंगी एनिगडीच्या गोलंदाजीवर पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार मारुन संघासह आपले खाते उघडल्याचे पाहायला मिळाले.

आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारताकडून पहिल्या चेंडूवर सर्वाधिक वेळा षटकार मारण्याचा विक्रम हा अभिषेक शर्माच्या नावे आहे.

अभिषेक शर्मानं आतापर्यंत आपल्या अल्प कारकिर्दीत तीन वेळा पहिल्या चेंडूवर षटकार मारल्याचे पाहायला मिळाले आहे.

२०२५ च्या आशिया कप स्पर्धेत अभिषेक शर्मानं UAE विरुद्धच्या सामन्यात हैदर अलीच्या गोलंदाजीवर डावाच्या पहिल्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारत खाते उघडले होते.

२०२५ च्या टी-२० आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मानं शाहीन शाह आफ्रिदीच्या षटकात डावातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता.

२०२१ मध्ये अहमदाबादच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात रोहित शर्मानं अदील रशीदच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर षटकार मारत आपले आणि संघाचे खाते उघडले होते.

भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने २०२४ मध्ये हरारेच्या मैदानात रंगलेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात सिकंदर रझाच्या गोलंदाजीवर डावाच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता.

२०२५ मध्ये वानखेडेच्या मैदानातील इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात संजू सॅमसन याने जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरचे स्वागत षटकार मारून केल्याचाही रेकॉर्ड आहे.