Join us  

वादग्रस्त हरमन! फेक डिग्रीमुळे DSP पद गेलं अन् आता भारतीय कर्णधारावर निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 1:40 PM

Open in App
1 / 11

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या चर्चेत आहे. बांगलादेशविरूद्धच्या शेवटच्या वन डे सामन्यात अम्पायर्ससोबत वाद घातल्यामुळे आयसीसीने तिच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे भारतीय कर्णधार आगामी दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांना मुकणार आहे.

2 / 11

आपल्या तापट स्वभावामुळे अनेकदा हरमन चर्चेत राहिली आहे. हरमनप्रीत कौर आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. या आधी देखील हरमन वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

3 / 11

अलीकडेच पार पडलेल्या बांगलादेश आणि भारत यांच्यातील अखेरच्या वन डे सामन्यात काही नाट्यमय घडामोडी घडल्या. ढाका येथे झालेल्या निर्णायक वन डे सामन्यात हरमनने अम्पायर्सच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावले होते. याशिवाय सामन्यानंतर बोलताना तिने काही गंभीर आरोप केले होते.

4 / 11

लेव्हल २ च्या गुन्ह्यासाठी हरमनला तिच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. खरं तर आगामी काळात हरमनप्रीत कौर दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बाकावर असणार आहे.

5 / 11

२०१७ मध्ये झालेल्या महिला विश्वचषकाच्या स्पर्धेत शानदार कामगिरी केल्याबद्दल हरमनला पंजाब पोलीस खात्यात डीएसपी पदावर नियुक्त करण्यात आले होते.

6 / 11

पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंद्र सिंग यांनी हरमनप्रीतच्या वर्दीवर स्टार्स लावले होते. पण, वादात सापडल्याने विद्यमान भारतीय कर्णधाराचे पोलीस उपाधिक्षकपद (DSP) काढून घेण्यात आले.

7 / 11

लक्षणीय बाब म्हणजे पंजाब पोलिसात क्रीडा कोट्यातून डीएसपी बनलेली हरमनप्रीत ही चौधरी चरण सिंग युनिव्हर्सिटीच्या (CCSU) नावाने बनावट पदवी दाखवल्याप्रकरणी दोषी आढळली होती.

8 / 11

हरमनच्या फेक डिग्री प्रकरणी पंजाब पोलिसांनी विद्यापीठाच्या दक्षता विभागाकडून गोपनीय चौकशी केली होती. तेव्हा गुणपत्रिकेची नोंद नसल्याचे दक्षता विभागाच्या निदर्शनास आले होते.

9 / 11

हरमनप्रीतची पदवी बनावट निघाल्यामुळे तिला पंजाब पोलिसांमध्ये हवालदारची नोकरी देण्यात येऊ शकते असे पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या कार्यलयाने स्पष्ट केले होते.

10 / 11

बांगलादेशविरूद्धच्या अखेरच्या वन डे सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या वादग्रस्त विकेटने अनेकांचे लक्ष वेधले. अम्पायरने बाद देताच हरमनने संताप व्यक्त करत स्टम्पच्या दिशेने बॅट भिरकावली. स्वीप मारण्याच्या प्रयत्नात असलेली हरमन फसली अन् बांगलादेशी खेळाडूंनी विकेटसाठी अपील केली. खरं तर स्लिपमध्ये झेलचा दावा केला त्यासाठी अपील केली गेली. मात्र, अम्पायरने तिला LBW बाद घोषित करताच हरमनचा राग अनावर झाला.

11 / 11

'मला वाटते की या सामन्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. क्रिकेटशिवाय इथे अम्पायरिंगचा हा प्रकार पाहून मी थक्क झाले. जेव्हा आम्ही पुढच्या वेळी येऊ तेव्हा आम्ही अशा प्रकारच्या अम्पायरिंगसाठी आधीच तयार असू. मी या आधीही सांगितले होते की, इथे अत्यंत खराब अम्पायरिंग आहे. काही निर्णयांमुळे मी दुखावले आहे', असे भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने सामन्यानंतर म्हटले.

टॅग्स :हरनमप्रीत कौरभारतीय महिला क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघआयसीसी
Open in App