Join us

Ajinkya Rahane Birthday wishes from Wife Radhika: "आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे"; अजिंक्य रहाणेच्या वाढदिवशी पत्नी राधिकाची ३ फोटो शेअर करत खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 12:39 IST

Open in App
1 / 6

Ajinkya Rahane Birthday wishes from Wife Radhika: टीम इंडियाचा मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याचा आज वाढदिवस. अजिंक्यने आज वयाची ३४ वर्षे पूर्ण करून ३५व्या वर्षात पदार्पण केले.

2 / 6

अजिंक्यने आपल्या आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीत अफलातून कामगिरी करत साऱ्यांचीच मनं जिंकली आहेत. विराटच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिका हरवण्याचा पराक्रम रहाणे कप्तानीमध्ये टीम इंडियाला शक्य झाला होता.

3 / 6

पण गेल्या काही महिन्यात खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियातून आपले स्थान गमवावे लागले. असे असले तरी त्याला कुटुंबीयांची कायमच साथ लाभली आहे. त्यामुळे आगामी कसोटी मालिकांसाठी दणक्यात पुनरागमन करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.

4 / 6

अजिंक्यची पत्नी राधिका धोपावकर-रहाणे ही त्याच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे आणि ती त्याचं प्रेरणास्रोत आहे, असं अजिंक्यने सांगितलं होतं.

5 / 6

अजिंक्यच्या वाढदिवशी राधिकाने त्याला गोड शुभेच्छा दिल्या असून तितकेच गोड फोटोही पोस्ट केले आहेत.

6 / 6

अजिंक्यच्या मुलीसोबतचाही एक फोटो त्यात पोस्ट केला असून, 'पती आणि वडिल या दोन्ही जबाबदाऱ्या सर्वोत्तम पद्धतीने पार पाडणाऱ्या अजिंक्यला शुभेच्छा', असे कॅप्शनही राधिकाने त्यासोबत लिहिले आहे. (सर्व फोटो- राधिका रहाणे Instagram)

टॅग्स :अजिंक्य रहाणेभारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२२इन्स्टाग्राम
Open in App