भारतीय संघ सध्या मायदेशात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. 'सूर्या' मालिकेत व्यग्र आहे, तर त्याची पत्नी देविशा शेट्टी तिच्या पारंपारिक लूकमुळे चर्चेत आहे.
देविशा शेट्टीने पारंपारिक लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यावर चाहते कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
'देसी गर्ल', अशा आशयाचे कॅप्शन देविशाने या फोटोंना दिले आहे.
देविशाचा पती सूर्यकुमार यादवने आयसीसी ट्वेटी-२० क्रमवारीत आपला दबदबा कायम ठेवला आहे.
सूर्यकुमारची देविशाशी पहिली भेट २०१२ मध्ये मुंबईच्या पोद्दार डिग्री कॉलेजमध्ये झाली होती. तेव्हा 'सूर्'या B.Com च्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता आणि देविशा १२ वी पास होती.
तेव्हा सूर्यकुमार यादवचे वय २२ तर देविशा शेट्टी १९ वर्षांची होती. सूर्यकुमारला चीअर करण्यासाठी अनेकदा देविशाने स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे.
कॉलेजमध्ये असतानाच 'सूर्या'ला देविशाचा डान्स खूप आवडला आणि तो तिच्या प्रेमात पडला.
तर देविशा देखील 'सूर्या'च्या फलंदाजीच्या शैलीमुळे प्रभावित झाली होती. तेव्हापासून दोघांनी जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१६ मध्ये लग्न केले.