टीम इंडियाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा कायम आपल्या ग्लॅमरस लूकसाठी चर्चेत असते.
धनश्री आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून प्रचंड अॅक्टिव्ह असते. तिचे समाजमाध्यमांवर लाखो चाहते आहेत.
युजवेंद्र चहलशी लग्न होण्याआगोदर धनश्री वर्मा सहसा आपले डान्सचे व्हिडीओ पोस्ट करताना दिसायची.
मिसेस चहल झाल्यानंतर ती युजी आणि टीम इंडियासोबत अनेक दौऱ्यांमध्ये दिसली तसेच IPL मध्येही दिसली.
या काळात धनश्रीने आपल्या फिटनेस व ग्लॅमरस लूकने साऱ्यांनाच घायाळ केले. तिने काही म्युझिक व्हिडीओदेखील केल्या.
गेल्या काही महिन्यांपासून ती आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे खूप चर्चेत आहे. चाहतेही तिला पसंतीची पावती देत आहेत.
युजवेंद्र चहलचे कोरोना काळात धनश्री वर्माशी प्रेम जुळले अन् मग त्यांनी 'चट मंगनी पट ब्याह' म्हणत लग्न केलं.
युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री डॉक्टर आणि कोरिओग्राफर आहे. सोशल मीडियावर तिचे डान्स व्हिडीओ हिट असतात.
कोरोना काळात धनश्रीकडे डान्सचे कोचिंग घेण्यासाठी युजवेंद्र चहलने अँडमिशन घेतली अन् तिथेच दोघे प्रेमात पडले.
लग्नानंतर धनश्री आणि युजवेंद्र दोघेही बराच काळ एकत्र फिरायचे. तसेच क्रिकेट दौऱ्यातही ती त्याच्यासोबत दिसायची.
पण दीड-दोन वर्षांपूर्वी धनश्रीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तेव्हापासून तिने प्रवास कमी केला असून फोटोशूटवर भर दिला आहे.
आजही धनश्रीच्या 'ब्युटी इन ब्लॅक' लूकला तिच्या फॅन्सने तुफान पसंती दर्शवली आहे. तिचा ताजा फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.