"नवऱ्याला गुडबाय म्हणायची वेळ.."; क्रिकेटरच्या पत्नीची पोस्ट, नेटकरी म्हणे- आणखी एक घटस्फोट?

Indian Cricketer Wife Viral Post, Divorce connection: भारताचा माजी क्रिकेटपटू व समालोचक याच्या पत्नीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केली आहे, त्यात म्हटलंय...

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा जोडीच्या घटस्फोटाची बातमी अगदी ताजी आहे. त्याआधी हार्दिक पांड्या, शिखर धवन, मोहम्मद शमी यांचेही घटस्फोट झाले आहेत.

भारतीय क्रिकेटमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अचानक भरपूर वाढल्याचे गेल्या काही वर्षात स्पष्टपणे दिसून येत आहे. मनीष पांडे-आश्रिता शेट्टी जोडीबाबतही चर्चा सुरु आहे.

अशातच आज सोशल मीडियावर एका माजी भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीने एक पोस्ट केली आहे. यातील कॅप्शनच्या सुरुवातीच्या शब्दांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

माजी क्रिकेटर आणि लोकप्रिय समालोचक आकाश चोप्रा याची पत्नी आक्षी चोप्रा हिने केलेली इन्स्टाग्राम पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत असून लोकांनी त्यावर कमेंट्स केल्यात.

आकाश चोप्राच्या पत्नीचे नाव आक्षी माथूर-चोप्रा. ती फॅशन स्टायलिस्ट आहे. आकाश-आक्षी या दोघांचे लग्न २००९ साली झाले असून उभयतांना दोन मुली आहेत.

आक्षी चोप्रा खूपच प्रतिभावान आहे. तिचा स्वत: कस्टमाईज्ड साबण बनवण्याचा व्यवसाय आहे. ELEVEN11_soapery असे आक्षी चोप्राच्या ब्रँडचे नाव आहे.

एका जुन्या मुलाखतीत तिने सांगितले होते की, तिला क्रिकेट सामने पाहणे आणि आकाश चोप्राची कॉमेंट्री आवडते. पण आज ती वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे.

आक्षी चोप्राने आज आकाश चोप्रासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोसोबत तिने लिहिलेल्या कॅप्शनमध्ये सुरुवातीलाच, नवऱ्याला गुडबाय केले आहे.

तिने फोटो पोस्ट करून लिहिले आहे, "माझ्या नवऱ्याला गुडबाय म्हणायची वेळ आलीय... पण हे गुडबाय तात्पुरते आहे. मी त्याला IPL साठी जाऊ देतेय, लवकरच भेटूया."

या पोस्टचा सुरुवातीचा मजकूर वाचून अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये म्हटले आहे की, हे पाहून वाटले आणखी एक घटस्फोटाची बातमी आली. पण सुदैवाने तसे नाहीये.