भारताचा अष्टपैलू अक्षर पटेल ( Axar Patel) यानं गुरुवारी साखरपुडा केला. त्यानं त्याच्या वाढदिवसाला आणखी विशेष बनवताना प्रेयसी मेहाला लग्नाची मागणी घातली.
अक्षर पटेलनं ( Akshar Patel) सोशल मीडियावर त्याच्या व मेहाच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यानं लिहिलं की, नवीन आयुष्याची ही सुरुवात आहे. आम्ही कायमचे एकमेकांचे झालो. तुला मी नेहमी प्रेम करत राहीन.'
२० जानेवारीला अक्षरनं २८ वा वाढदिवस साजरा केला आणि त्यानं गर्लफ्रेंड मेहासोबत साखरपुडा करून हा आनंद द्विगुणित केला. अक्षरच्या साखरपुड्याला त्याचे कुटुंबातील सदस्य व जवळचे मित्र उपस्थित होते.
भारतीय अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे आणि त्यामुळे त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झाली नाही. पण, मायदेशात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून तो पुनरागमन करू शकतो.