Join us

Rohit Shrma World Record: 'हिटमॅन'ला खुणावतोय मोठा विक्रम; सचिन, विराट, स्मिथलाही जमला नाही असा पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 20:40 IST

Open in App
1 / 6

Rohit Shrma World Record: टीम इंडिया आणि विंडीज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना आज सेंट किट्सच्या वॉर्नर पार्कवर होत आहे. दुसरा सामना जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य असेल. त्यासोबतच दुसऱ्या टी२० सामन्यात सर्वांच्या नजरा असतील त्या इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्णधार रोहित शर्मावर...

2 / 6

भारत-विंडिज पहिल्या सामन्यात रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करत सर्वोत्तम खेळी केली. त्याने अर्धशतक ठोकल्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. मोठा फटका खेळताना रोहित शर्मा बाद झाला, पण तोपर्यंत त्याने ४४ चेंडूत ६४ धावा केल्या होत्या.

3 / 6

आता रोहित शर्माने दुसऱ्या T20 मध्ये ४४ धावा केल्या तर तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावा पूर्ण करेल. रोहित शर्माने आतापर्यंत भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये ४०७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४३.४७ च्या सरासरीने १५,९५६ धावा केल्या आहेत.

4 / 6

भारतासाठी केवळ सहा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार किंवा त्याहून अधिक धावा करू शकले आहेत. भारताकडून सर्वाधिक धावा करणारा सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडुलकरने ६६४ सामन्यांमध्ये ४८.५२ च्या सरासरीने ३४ हजार ३५७ धावा केल्या. त्यात १०० शतकांचा समावेश आहे.

5 / 6

सर्वाधिक धावांच्या या यादीत दुसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. द्रविडने ५०४ सामन्यांत ४५.५७ च्या सरासरीने २४ हजार ६४ धावा केल्या आहेत. या दरम्यान द्रविडने ४८ शतके ठोकली असून १४५ अर्धशतके केली आहेत.

6 / 6

दरम्यान रोहितच्या बाबतीत खरी विशेष बाब पुढे आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावांचा टप्पा याआधीही काही महान फलंदाजांनी गाठला आहे. पण रोहित शर्माने अर्धशतक ठोकून ५७ धावांचा आकडा गाठला, तर आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये तो ३ हजार ५०० धावांचा टप्पा ओलांडेल. आणि हा टप्पा पूर्ण करणारा रोहित जगातील पहिला फलंदाज ठरेल.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघसचिन तेंडुलकरराहुल द्रविड
Open in App